AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगताय, २८ वर्षांपासून फरार आरोपीला ‘BEST’ कर्मचाऱ्यामुळे अटक

तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक करण्यासाठी 'BEST' कर्मचाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आता पोलिसांनी त्या गुन्ह्या प्रकरणात त्याची कसून चौकशी करत आहे.

काय सांगताय, २८ वर्षांपासून फरार आरोपीला 'BEST' कर्मचाऱ्यामुळे अटक
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 22, 2023 | 12:31 PM
Share

मुंबई : गेल्या २८ वर्षांपासून गुन्हा करुन आरोपी फरार होता. त्याच्या शोधासाठी अनेक अधिकारी आले अन् गेले. परंतु तो सापडत नव्हता. पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी आले म्हणजे त्याच्या समोर त्या फरार आरोपीची फाईल असायची. परंतु तो काही हाती लागत नव्हता. यावरुन तुम्हाला कल्पना आली असेल की तो आरोपी किती धूर्त व चतुर होतो. अखेरी असा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला. परंतु तो काही पोलिसांच्यामुळे नव्हे तर ‘BEST’ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो पोलिसांना सापडला. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे अन् चौकशी सुरु आहे.

काय आहे प्रकरण

मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. 1995 मध्ये वीरेंद्र संघवी उर्फ ​​महेश शाह यांच्यावर बनावट शेअर्स विकल्याचा आरोप होता. पोलिसांनी वीरेंद्रविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.परंतु वीरेंद्र फरार होता.पोलीस त्याचाही शोध घेत होते. अखेर 28 वर्षांनंतर पोलिसांना यश आले आणि वीरेंद्रला अटक करण्यात आली.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी मदत केली

पोलिसांनी वीरेंद्रला अटक करण्यासाठी ‘BEST’ कर्मचाऱ्यांची मदत घेतली. प्रत्यक्षात वीरेंद्र दाना बंदर परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी वीज बिल पडताळणीच्या बहाण्याने वीरेंद्रला ‘BEST’ च्या कार्यालयात भेटायला बोलावले. त्याठिकाणी तो पोहचताच त्याला अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा