AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा विदेशात पाठवून नफा कमवण्याचे आमिष, लाखो रुपयांनी गंडवले

पुणे शहरातील कांदा व्यापाऱ्याची व्यवसायातून कर्नाटकामधील दोघांशी ओळख झाली. त्या दोघांनी विदेशात कांदा पाठवून मोठा नफा कमवण्याचे आमिष दाखवले. व्यापाऱ्याकडून त्यांनी कांदा घेतला. परंतु त्याचे पैसे दिले नाही. वारंवार मागणी करुनही पैसे मिळाले नाही.

कांदा विदेशात पाठवून नफा कमवण्याचे आमिष, लाखो रुपयांनी गंडवले
crime newsImage Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 22, 2023 | 10:51 AM
Share

पुणे : सर्वसामान्यप्रमाणे व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. व्यापाऱ्यात नफा कमवण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. आता पुणे शहरातील एका कांदे व्यापाऱ्याची अशीच फसवणूक केली गेली आहे. विदेशात कांदा पाठवून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्यापाऱ्याची फसवणूक करणारे दोन्ही जण कर्नाटकातील आहे.

नेमके काय झाले

पुणे शहरातील एका कांदा व्यापार्‍याची कर्नाटकमधील आरोपींची व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी व गजेंद्र सिद्धप्पा (राहणार, कर्नाटक) यांनी फिर्यादीस लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवले. कांदा विदेशात पाठवून नफा कमवण्यात येणार असल्याचे पुणे येथील 32 वर्षीय व्यापाऱ्यास सांगितले. दोघांनी तब्बल 46 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता ही फसवणूक केली. ही घटना मार्च 2021 नंतर घडली आहे

अशी झाली ओळख

व्यवसायातून फिर्यादी आणि आरोपींची ओळख झाली. सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी व गजेंद्र सिद्धप्पा यांनी आपण मोठे कांदे व्यापारी असल्याचे सांगितले. हळहळू त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. काद्यांचा माल विदेशात पाठवून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी कांद्याचा माल घेतला. परंतु या मालाचे पैसे दिले नाही. एकूण 46 लाख 36 हजार रुपये परत न देता व्यापाऱ्याची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?