Eknath Shinde : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे…अतुल भातखकरांच्या ट्विटने चर्चांचा महापूर

"रिमझिम पाऊस पडे सारखा मिठीलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे..." असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तर दुसरीकडे ठाकरेंचे दिवस फिरले...असे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे.

Eknath Shinde : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे...अतुल भातखकरांच्या ट्विटने चर्चांचा महापूर
पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे...अतुल भातखकरांच्या ट्विटने चर्चांचा महापूर
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 21, 2022 | 12:32 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानं शिवसेनेच्या नेत्यांना ऐन पावसाळ्यात घाम फुटला आहे. सरकावर संकटाचे (Cm Uddhav Thackeray) गडद ढग दिसू लागले आहे. त्यातच आता भाजप नेत्यांच्या क्रिएटीव्हिटीला बहर आला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर, निलेश राणे यांचं ट्विट संध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. कारण “रिमझिम पाऊस पडे सारखा मिठीलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे…” असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. तर दुसरीकडे ठाकरेंचे दिवस फिरले…असे ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे. आता एवढे ट्विट आल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही मागे राहिले नाहीत. त्यांनी शब्बास एकनाथ म्हणत…एक सूचक ट्विट केलं आहे. तेही जास्त चर्चेत आहे.

अतुल भातखळकरांचं ट्विट

निलेश राणे यांचाही ट्विटरवरून हल्लाबोल

नारायण राणेंच्या ट्विटचा अर्थ काय?

यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. त्यामुळे हे ट्विटही सध्या चांगलेच चर्चेत आहे.

नारायण राणेंचं ट्विट

काँग्रेसची तातडीची बैठक

या बंडानंतर काँग्रेसनेही तातडीने बैठक बोलावली आहे. काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांची आज सायंकाळी मुंबईत बैठक आहे अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. सर्व आमदार आणि मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलावलं आहे. ही बैठक बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी सायंकाळी होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. सेना फुटीच्या पार्श्वभुमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपचीही दिल्लीत महत्वाची बैठक

तिकडे भाजपच्या गोटातल्या हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत.जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींबाबत ही बैठक सुरू आहे. फडणवीसही काही बैठका दिल्लीत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. आता ती काय असणार? यासाठी थोडी वाट पाहवी लागणार आहे.