
मध्य रेल्वेच्या इगतपूरीत अप मार्गावर खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या त्यामुळे खोळंबल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. या मालगाडीला सुरु करण्यासाठी दुसरे इंजिन मागवण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहेत.
मध्य रेल्वेच्या इगतपूरी सेक्शनमध्ये अप मार्गावर खर्डी ते उंबरमाळी स्थानकाच्या दरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडल्याने मध्ये रेल्वेच्या लोकल विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लांबपल्ल्याची गाड्या आणि लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला आहे.
मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी स्थानकाच्या मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अनेक लांबपल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला आहे. पुष्पक एक्सप्रेस, हरिद्वार एक्सप्रेस या खोळंबल्या असून त्या इगतपुरी स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या प्रवाशांचा या बिघाडाचा फटका बसला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.