VIDEO : हातात मूळा, गाजर…. भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सचा अनोखा रॅम्पवॉक

फॅशन शो म्हटल्यावर तो महागडा सेट, महागडे कपडे हे आठवतं. पण मॉडेल्सने हा रॅम्प वॉक महागड्या सेटवर करण्याऐवजी भाजी मार्केटमध्ये केला आहे. सध्या सोशल मीडियावर या रॅम्प वॉकचे व्हि़डिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO : हातात मूळा, गाजर.... भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सचा अनोखा रॅम्पवॉक
RAMP WALK IN MUMBAI VASAI VEGETABLE MARKET
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 5:59 PM

फॅशन शो म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते भव्य रॅम्प महागडे डिझायनर कपडे, आकर्षक लाईटिंग्स आणि नक्कीच डोळ्यात भरतो मॉडेल्सचा स्टाईलिश अंदाज. सध्या सोशल मीडीयावर एक वेगळाच रॅम्प वॉक पाहायला मिळतोय. हा रॅम्प वॉक मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये भरला आहे. मॉडेल्सच्या हातात बॅग किंवा दागिन्यांऐवजी हातात मुळा, कोथिंबीर आणि गाजर घेऊन वॉक करताना दिसत आहेत. सध्या हा रॅम्प वॉक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फॅशन शोचं नाव व्हिजन व्होग फॅशन वीक असं ठेवण्यात आलं होतं. वसईतील अंबाडी रोडवरील गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये हा अनोखा उपक्रम सादर करण्यात आला. मुंबईतील फॅशन मेंटॉर आणि मॉडेल साहिल सिंग यांनी ही संकल्पना मांडली. पारंपरिक फॅशन शोच्या चौकटीबाहेर जाऊन रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या वस्तूंचाही फॅशनमध्ये वापर करता येतो. हे दाखवण्याचा त्यातून उद्देश होता.

Loading...

या रॅम्प वॉकमध्ये तरूण आणि तरूणी अशा दोन्ही गटांतील मॉडेल्स सहभागी झाले होते. भाजी मार्केटमधील अरूंद गल्ल्यांमधून ते आत्मविश्वासाने कॅटवॉक करताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला भाजी विक्रेते, दुकाने आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक तिथेच होते आणि त्यातच हा रॅम्प वॉक चालू होता. कोणाच्या हातात मुळा होता, तर कोणाच्या हातात कोथिंबीरीची जुडी दिसत होती. काहींनी तर बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर पेहरावासाठी केला होता.

 

 

या उपक्रमात व्हिजन व्होग अकॅडमीच्या सुमारे 50 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. तसेच या संकल्पनेमागे साहिल सिंग यांच्यासोबत कॅरिसा डी ब्रिटो, रोहित चौधरी, जतिन गामी हे सुद्धा सहभागी होते.

या फॅशन शोचा व्हिडिओ ,साहिल सिंग यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पहाडी गाण्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या गाण्याला वेगळाच देसी रंग मिळाला आहे.

महागडे कपडे किंवा भव्य मंच नसला तरी कल्पना आणि आत्मविश्वासाच्या जोरावर फॅशन सादर करता येते. हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या मार्केटमध्ये अचानक सुंदर रॅम्प वॉक पाहायला मिळाल्याने हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us