“रामदेवबाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”; सुषमा अंधारे यांनी कायद्याची कलमं समजून सांगितली

| Updated on: Jan 17, 2023 | 8:04 PM

उर्फीच्या जावेद अडनावाऐवजी दुसरे आडनाव असते तर राज्यातील इतर सर्व समस्या सोडून त्यावर कुणी चर्चा केली असती का असा टोलाही त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

रामदेवबाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; सुषमा अंधारे यांनी कायद्याची कलमं समजून सांगितली
Follow us on

मुंबईः महिलांनी कपडे घातले नसले तरी त्या सुंदर दिसतात असं वक्तव्य योगगुरू रामदेवबाबा यांनी केले होते. त्यांनी ज्यावेळी असे वक्तव्य केले होते, त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होत्या तरीही रामदेवबाबा यांच्या बेताल वक्तव्याबद्दल कुणीही आक्षेप का घेतला नाही असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी यावेळी रामदेवबाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

योगगुरु रामदेवबाबा यांनी बेताल आणि महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य केल्यानंतर अमृता फडणवीस असो की राज्यातील एकाही व्यक्तीला त्याबद्दल काही वाटत नाही त्यावरूनच राजकारण समजून येतं असा टोला त्यांनी भाजपमधील नेत्यांना लगावला. उर्फी जावेद या अभिनेत्रीच्या पेहराव्यावरून ज्या प्रकारे राज्यात राजकारण चालू आहे.

त्यावरून असं दिसतं की, उर्फीच्या जावेद अडनावाऐवजी दुसरे आडनाव असते तर राज्यातील इतर सर्व समस्या सोडून त्यावर कुणी चर्चा केली असती का असा टोलाही त्यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

ज्या प्रकारे योगगुरू रामदेवबाबा महिलांच्या कपड्यांविषयी बोलतात त्यावरून महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होणारीच वक्तव्य आहेत. त्यामुळे विनयभंगाचा गु्न्हा आधी रामदेवबाबा यांच्यावर नोंदवला गेला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

विनयभंगाचा गुन्हा नोंद होत असतानाच त्याविषयी कलम ३५४ मध्ये सांगण्यात आले आहे की, कायद्यानुसार उच्चारण, वाक्य, कृत्ती, उक्ती, घटना, काहीही स्री सुलभतेला, लज्जा किंवा संकोच उत्पन्न होईल तिथे विनभंगाचा गुन्हा दाखल होतो. मग रामदेवबाबा यांच्याविरुद्ध गुन्हा का नोंद केला जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रामदेवबाबा यांनी केलेली वक्तव्य ही महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी वक्तव्यं आहेत, त्यामुळे सगळ्यात आधी रामदेवबाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.