AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुडा पायलट ते बिहारला जाण्याची घाई, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे प्रश्न

Rohit Pawar Press : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केले आहे. यात त्यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

दारुडा पायलट ते बिहारला जाण्याची घाई, रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे प्रश्न
rohit pawar Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 7:37 PM
Share

अजित पवार यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांनी यावेळी प्रेझेंटेशन सादर केले. यात त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रोहित पवारांचे 10 मोठे प्रश्न

  • रोहित पवार म्हणाले की, आयलेस सिसिस्टिम बारामतीत नसल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मोठमोठी विमाने लँड होतात. मुंबईत तर आयलेस सिस्टिम होती, मग 2023 साली लेअरजेट विमानाचा अपघात कसा झाला होता?
  • व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना सेवा जाते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे?
  • अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. तिथून शमशाबाद ते बिहारमधील पटनाला जायचे होते. यांना घाई होती. नाही तर 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं का?
  • ईएएसएने कंपनीच्या ना वापराबद्दलचं प्रमाणपत्र दिलं तरी डीजीसीएने कंपनीला विमान वापराची परवानगी का दिली. हा आमचा सवाल आहे.
  • कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी ही नावे बदलण्यात आलं. मदनच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. तेव्हा मदन यांच्या पत्नीने सोशल मीडियावरून अफवा असल्याचं सांगितलं.
  • टेक ऑफपूर्वी पायलट का बदलले गेले? कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी हे दोन पायलट बदलण्यात आले.
  • एका व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅट समोर आल्या आहेत. कॅप्टन दारू पिल्याच्या यात चर्चा आहे. पायलट असून डायरेक्टर दारू पित असेल तर गंभीर गोष्ट आहे असं म्हणत रोहित पवारांनी पायलटवर नशेखोर असल्याची शंका उपस्थित केली आहे.
  • 5000 किलोमीटरची व्हिजिबिलिटी येत नाही, तोपर्यंत विमान उडवायचंच नाही असा नियम आहे. अॅरोलाही जबाबदार धरलं पाहिजे. व्हिजिबिलीटी नसताना ओके म्हटलं. पायलट हिरोगिरी करायला का गेला?
  • विमान लँड होण्यापूर्वी गावाच्या मंदिराच्या कळसाला घासून गेलं. विमान क्रॅश करायचा हेतू होता का. सारखं सारखं तुम्ही डोंगराळ भागात विमान का नेत होता. डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होता का?
  • आज अजितदादांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिलं. त्यांनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांच्याच पक्षातील लोकांना शंका आहे. या विषयाचं राजकारण करायचं नाही. कोणत्या राजकीय पक्षाचा हात आहे असं म्हणायचं नाही. पण नक्कीच घात झाला. कसा झाला? कुणी केला? याची चौकशी झाली पाहिजे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?