AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडे काय आहे? सोनं, चांदी की बिटकॉइन? जगाला श्रीमंत बनवणाऱ्या व्यक्तीची पोस्ट व्हायरल

"रिच डॅड पुअर डॅड" लेखक रॉबर्ट कियोसाकी यांची आर्थिक तयारीबद्दलची पोस्ट व्हायरल झाली आहे. ते स्वतःला 'प्रेपर' म्हणतात आणि आर्थिक संकट, महागाईचा सामना करण्यासाठी सोनं, चांदी आणि बिटकॉइनसारख्या मालमत्ता असणे आवश्यक असल्याचे सांगतात. सरकार पैसे छापून लोकांची संपत्ती चोरत असल्याचा त्यांचा दावा आहे.

तुमच्याकडे काय आहे? सोनं, चांदी की बिटकॉइन? जगाला श्रीमंत बनवणाऱ्या व्यक्तीची पोस्ट व्हायरल
Robert KiyosakiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 11:55 AM
Share

रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते नेहमीच कामाच्या पोस्ट टाकत असतात. खासकरून लोकांना श्रीमंतीचा मंत्र देणाऱ्या पोस्ट ते व्हायरल करत असतात. त्यामुळे त्यांच्या पोस्ट वेगाने व्हायरल होत असतात. त्यांच्या पोस्टची तर अनेकजण वाटच पाहत असतात. आता त्यांची एक नवीन पोस्ट व्हायरल झाली आहे. यात त्यांनी स्वत:ला आपत्कालीन तयारी करणारा व्यक्ती, असं म्हणवून घेतलं आहे. तसेच तुमच्याकडे सोने-चांदी किंवा बिटकॉइन आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. कियोसाकी यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांनी ट्विटरवर ही पोस्ट केली आहे. मी प्रेपर (आगाऊ तयारी करणारा) का आहे? काही दिवसांपूर्वी काही लोकांच्या ग्रुपशी चर्चा करताना मी प्रेपर असल्याचं त्यांना म्हटलं होतं. त्यावर एका महिलेने हात उंचावून सवाल केला. तुम्ही प्रेपर आहात, तर मग तुम्ही निराशावादी नाही का? सकारात्मक विचार अधिक चांगला नसतो का? असा सवाल या महिलेने मला केला होता.

महिलेच्या या प्रश्नावर कियोसाकी यांनी तिला उलटा सवाल केला होता. तुमच्याकडे कारचा विमा आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर होय, माझ्याकडे आहे, असं ही महिला म्हणाली होती. त्यावर कियोसाकी यांनी तिला आणखी एक प्रश्न केला. तुम्हाला वाटतं का एखादा अपघात व्हावा? कियोसाकी यांच्या या प्रश्नावर त्या महिलेने नकारात्मक उत्तर दिलं. नाही. अपघात झाला तर बचाव झाला पाहिजे, म्हणून मी विमा घेतला आहे, असं या महिलेने त्यांना सांगितलं.

अर्थव्यवस्था कोसळली तर काय होणार?

कियोसाकी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या महिलेला, तुमच्याकडे सोनं, चांदी किंवा बिटकॉइन आहे का? असा सवाल केला. या महिलेने नाही म्हणून सांगितलं. त्यावर, तुमच्याकडे जर यापैकी कोणताच असेट नसेल आणि अशावेळी अर्थव्यवस्था कोसळली तर तुमच्या पैशाचं काय होणार? असा सवाल कियोसाकी यांनी केला. त्यावर, सरकार अजून पैसे छापेल, असं ही महिला म्हणाली.

आपली संपत्ती चोरली जातेय

महिलेच्या या उत्तरावर कियोसाकी यांनी पुन्हा तिला प्रश्न केला. सरकारने ज्यादा पैसे छापले तर तुमच्या पैसे खरेदी करण्याच्या क्षमतेचं काय होणार? असा सवाल त्यांनी केला. हा प्रश्न येताच महिलेने तिची पैसे खरेदी करण्याची क्षमता कमी होईल असं सांगितलं. त्यानंतर कियोसाकी हाच तर्क समजावून सांगत म्हणाले, यालाच महागाई म्हणतात.

अमेरिका फेड (US Fed) आणि सरकार आपल्या पैशांच्या द्वारेच आपली संपत्ती चोरत आहे. तेही कायदेशीररित्या. कारण त्यांच्याकडे अधिकार आहे. त्यामुळे ते अधिक पैसे छापू शकतात. ते टॅक्स आणि महागाईच्या माध्यमातून आपली संपत्ती चोरतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

असा पैसा असावा की…

सरकारने छापू नये असा पैसा मला हवा आहे. माझ्याकडे तेलाच्या विहिरी आहेत. सरकार मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करते. ते चांगले ग्राहक आहेत. ते मला स्वत: पैसे देतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कियोसाकी यांच्या प्रत्येक पोस्ट प्रमाणे ही पोस्टही वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर जगभरातील लोक कमेंट करत आहेत.

Follow Us
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?