AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानाचा अधिकार धोक्यात… माजी न्यायामूर्तींचा दावा; सर्वोच्च न्यायालयाला काय केलं आवाहन?

माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एसआयआरमुळे मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे हटवली जात असल्याने मतदानाचा अधिकार धोक्यात आला आहे, असे ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मतदानाचा अधिकार धोक्यात... माजी न्यायामूर्तींचा दावा; सर्वोच्च न्यायालयाला काय केलं आवाहन?
Rohinton NarimanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 11:19 AM
Share

एसआयआरवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. एसआयआरच्या नावाखाली मतदार यादीतून मतदारांचे नाव हटवले जात असून त्यांच्या मतदानाच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी जस्टिस उज्ज्वल भुईयां यांनी सवाल केलेले असतानाच आता जस्टिस नरीमन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायामूर्ती रोहिंटन फली नरीमन यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने काम करणारा निवडणूक आयोग ठेवला जाऊ शकत नाही, असं नरीमन यांनी म्हटलं आहे.

एसआयआरमधून मोठ्या संख्येने मतदारांचे नाव हटवण्यात आले आहे. एका रिपोर्टमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्तांचं ऐकत नसून परस्पर निर्णय घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून नरीमन यांनी चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांचे नाव मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. त्यानंतरही एसआयआरवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काहीच केलं नाही, त्यावरही नरीमन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ही धोक्याची घंटी

यावेळी नरीमन यांनी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरही सवाल केले आहेत. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पूर्णपणे सरकारच्या हातात देणं म्हणजे धोक्याची घंटी आहे. त्यामुळे मत देण्याचा अधिकार मोठ्या संकटात सापडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियमाच्या (CEC अॅक्ट) वैधतेवर लवकर निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भुइयां काय म्हणाले होते?

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उज्जवल भुइयां यांनीही एसआयआरवरून गंभीर चिंता व्यक्त केली होती. मृत मतदारांना वगळता, एकदा मतदान यादीत नाव सामील झाल्यावर नोटीस दिल्याशिवाय किंवा कोणत्याही सुनावणी शिवाय त्यांची नावे हटवली जाऊ शकत नाही. मतदान करणे आणि मतदार यादीत समाविष्ट होण्याच्या अधिकाराला भारतीय नागरिकाच्या आयडेंटिटीपासून वेगळं केलं जाऊ शकत नाही, असं भुइयां म्हणाले होते.

दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत यांना येण्यापासून रोखणाऱ्या नालसार विद्यार्थ्यांचं भुइयां यांनी कौतुक केलं. तुम्ही देश आणि जगाला दाखवून दिलंय की, विद्यापीठाचे विद्यार्थी आणि तेही विधी शाखेचे विद्यार्थी कसे असावेत. तुम्ही हुशार आहात. निडर आहात आणि शूर आहात, अशा शब्दात त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.

Follow Us
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...