AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत

रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्… नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत

| Updated on: Oct 05, 2026 | 11:16 AM
Share

आमदार नितेश राणे यांनी पुणे येथे एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांना सरकारकडून सकारात्मकतेची ग्वाही दिली. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुंबईतील मोर्चावरून ज्ञानेश कुमार आणि एसआर रद्द करण्याच्या मागणीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, रोहित पवार लवकरच सरकारमध्ये मंत्री म्हणून येतील असे संकेतही त्यांनी दिले.

पुणे येथे एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री या मुद्द्यावर अत्यंत सकारात्मक असून, त्यांनी विद्यार्थ्यांशी पावणे तीन तास चर्चा करून १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचे राणे यांनी सांगितले. याशिवाय, व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून, भविष्यात एमपीएससी संदर्भात विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही, अशी पारदर्शक प्रणाली आणली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केलेल्या टीकेला राणे यांनी प्रत्युत्तर देत आपण येथे केवळ विद्यार्थ्यांसाठी आलो असल्याचे म्हटले.

याशिवाय, नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दलही सूचक विधाने केली. “रोहित पवार काही काळात आमच्यासोबत सरकारमध्ये मंत्री असतील,” असे संकेत त्यांनी दिले. “दिवाळीत कुठे फटाके फुटतात बघू,” असे म्हणत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधले. रोहित पवार हे त्यांचे चांगले मित्र असल्याचे सांगत आणि विधिमंडळात त्यांच्या चांगल्या भाषणाचे कौतुक करत, राणे यांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वेठीस न धरण्याचा सल्ला दिला. शरद पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांनी ज्यांनी राज्य आणि देशाचे नेतृत्व केले आहे, त्यांच्या विचारांवर चालणाऱ्यांनी घटनात्मक मुद्द्यांवर समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. पुढे ते म्हणाले, रोहित पवार भावी कॅबिनेट मंत्री,ते आमचे सहकारी होऊन सरकारमध्ये येऊ शकतात… ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी सुरू आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. एमपीएससीच्या पूर्ण प्रणालीमध्ये मुख्यमंत्री जे बदल घडवून आणू इच्छितात, त्यामुळे भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, अशी पारदर्शक प्रणाली महाराष्ट्रात आणली जाईल, असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

Published on: Oct 05, 2026 11:16 AM

Follow Us