बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
बोरीवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात गुजराती भाषेतील बॅनर लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन छेडले आहे. मराठी भाषेचा आग्रह धरत मनसे कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले. मराठीला डावलून गुजराती भाषेतील फलक लावले जात असल्याचा आरोप मनसेने केला असून, महानगरपालिकेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई, बोरीवली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात गुजराती भाषेत बॅनर लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आंदोलन छेडत गुजराती बॅनर फाडून टाकले. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावे, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, उद्यानाच्या गेटवर गुजराती भाषेत लावलेले नाव काढण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती.
मात्र, त्यानंतरही आता नवीन गुजराती बॅनर लावण्यात आले आहेत, जे आम्हाला मान्य नाहीत. गुजरातमध्ये मराठी चालत नाही, तर महाराष्ट्रात गुजरातीची सक्ती का, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. महानगरपालिकेने मराठी, हिंदी आणि गुजराती या तीनही भाषांमध्ये बॅनर लावण्याची सूचना केली असली तरी, मनसेने हे अमान्य केले आहे. राज्यात मराठी भाषेलाच महत्त्व दिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. मनसेने इशारा दिला आहे की, जर हे बॅनर हटवले नाहीत, तर तीव्र आंदोलन सुरूच राहील.
Published on: Oct 05, 2026 11:46 AM
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...

