AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate | सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी कोसळले

सोन्याच्या भावात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण झाली असून आजचा सोन्याचा भाव 41 हजार 600 रुपये प्रति तोळा आहे.

Gold Rate | सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी कोसळले
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 13, 2020 | 10:19 AM
Share

मुंबई : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा  (Gold Rate Fall) मोठा परिणाम आता राष्ट्रीय आंतराष्ट्रीय बाजारावर होतो आहे. एकीकडे शेअर बाजारात निर्देशांक 3100 अंकांनी कोसळल्याने सर्व व्यवहार ठप्प पडले. तर दुसरीकडे, सोन्याच्या भावातही विक्रमी घसरण (Today’s Gold Rate) झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल 2 हजार 600 रुपयांची घसरण झाली आहे (Gold Rate Fall).

सेन्सेक्समधील पडझडीचा परिणाम (Gold Rate Fall) सोने दरावरही होत आहे. आज एकवेळ अशी आली की सोन्याच्या दरात तब्बल 2,600 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोन्याचा तोळ्याचा भाव 41,600 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर मार्केटमध्ये चढउतार सुरुच आहे. दिवसअखेर सोन्याचा भाव कितीवर स्थिरावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Share Market | मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड, तासाभरासाठी व्यवहार बंद, सोन्याचे दरही पडले

कोरोनामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात (Gold Rate Fall) सतत घसरण होत आहे. काल सोन्याचा भाव 44 हजार 200 रुपये प्रति तोळा होता. त्यामध्ये आज विक्रमी घसरण झाली असून आजचा सोन्याचे दर 41 हजार 600 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले.

सोनं दराच्या घसरणवर तज्ज्ञ काय म्हणतात?

“कोरोना विषाणूचा शेअर बाजारावर मोठ्या (Today’s Gold Rate) परिणाम झाला आहे. फ्रान्स, जर्मनी, लंडन, अमेरिकेच्या कोस्टल एरियावर याचा परिणाम झाला आहे. मुंबईतही याचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा पेमेंट आता सोन्यामध्ये होणार आहे. म्हणून सोन्याच्या भावात इतकी मोठी घसरण झाली”, अशी माहिती शेअर बाजार तज्ज्ञ कुमार जैन यांनी दिली.

“काल ते आजपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 85 डॉलरची घसरण झाली आहे. त्यामुळे जे सोनं काल 44 हजार 200 रुपयांवर होतं ते आज 41 हजार 600 वर येऊन पोहोचलं आहे. पण पुढे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कितीही मोठी महामारी आली तरी लोक सोनं घेणारच. सोनं अजून कमी होईल आणि मग ते वधारेल.”, असंही कुमार जैन (Gold Rate Fall) यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

जगभरात आर्थिक मंदीचं सावट, सोन्याचे भाव वाढतेच, तर चांदीच्या किमतीत घट

भारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकात 76 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

सॅनिटायझर नव्हे, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी साबणच प्रभावी हत्यार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...