AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणरत्न सदावर्ते निवणूकीच्या रिंगणात?, ”या’ दोन नेत्यांविरूद्ध डंके की चोट पे निवडणूक लढवेल’

आगामी निवडणूकीच्या आखाड्यात विजयश्री मिळवण्यासाठी सर्व नेतेमंडळी आता कामाला लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोन नेत्यांची नावे घेत यांच्याविरूद्ध आपण निवडणूक लढवत पाणीपत करून सोडू असं म्हटलं आहे. कोण नेते आहेत जाणून घ्या.

गुणरत्न सदावर्ते निवणूकीच्या रिंगणात?, ''या' दोन नेत्यांविरूद्ध डंके की चोट पे निवडणूक लढवेल'
Gunratna Sadavarte
| Updated on: Mar 03, 2024 | 11:54 PM
Share

मुंबई | आगामी निवडणूकांआधी जागावाटपावरून महायुती आणि मविआकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. काही जागांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षा आपापसात चर्चा करत आहे. लोकसभा निवडणूका झाल्यावर विधानसभा निवडणूकाही आहेत. त्यामुळे राजकीय समीकरण कशी आणि किती बदलतात आणि  कोणाचं तिकीट कापलं जाणार आणि कोणाचं तिकीट फायनल होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं लागलं आहे. अशातच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनीसुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे घेतली आहे. ज्यांच्यविरूद्ध ते निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्याचेच सुपुत्र आदित्य ठाकरे आहेत. दोघांविरूद्ध निवडणूक लढवली तर पाणीपत करून सोडणार असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

चुकीचा विचारांच्या सोबत जाणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवायची वेळ आली हिंदुत्ववादी पक्षाकडून नक्की डंके की चोट पे लढवेल. त्यांचं पाणीपत करून सोडेल, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

नथुराम गोडसे साहेबांच विचारपीठ निर्माण झालं पाहिजे, पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतले त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर, शक्ती प्रदान झालेली आहे.अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. राजकारणाच्या नावावर आरक्षणाचे दुकानदारी चाललेली आहे. ती थांबली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नसल्याचं सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं आहे. यावर ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...