AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | ‘…तर आम्ही तुमच्यासोबत येतो’, निवडणूकीआधी उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील धारावी येथे घेतलेल्या सभेत भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. भाजपला आव्हान करत जर ती गोष्ट मिळाली असेल तर आम्ही तुमच्यासोबत येणार असल्याचं मोठं वक्तव्य ठाकरेंनी केलं आहे.

Uddhav Thackeray | '...तर आम्ही तुमच्यासोबत येतो', निवडणूकीआधी उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
| Updated on: Mar 03, 2024 | 9:43 PM
Share

मुंबई, दिनांक 3 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणूकीआधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत.  भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करत आहे. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेमध्ये आम्ही तुमच्यासोबत येतो म्हणत भाजपलाचा आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं. त्यापैकी किती आले. आले असती तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केलं नाही. जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पहिल्यांदा आपल्याला दिल्लीचे तख्त फोडावे लागेल. अब की बार भाजप तडीपार घोषणा द्यावी लागेल. हे कसले 400 पार होतो बघतो. गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पार गेला नसता. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं वेगळं आहे. आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आमच्यासोबत समाजवादी आले, मुस्लिम येतात. आमचं हिंदुत्व चुल पेटवणारं आहे. तुम्ही पेटवणारे आहे. आमचं हिंदुत्व गाडगेबाबांचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसकडे 800 कोटी होते आणि भाजपकडे आठ हजार कोटी  मग कुणी देशाला लुटलं. दहा वर्षात एवढे पैसे आले कुठून. जे दहा वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं हे मोदी बोलतात ते खरं आहे. जनतेला लुटायचं आणि मोठमोठ्या जाहिराती करायच्या. या पैशाचा वापर त्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.