Shiv Jayanti | राज्यभर शिवजयंतीचा जल्लोष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिवरायांना साष्टांग नमन
हाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुका, व्याख्याने आणि शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ऐतिहासिक स्थळांवर तसेच शिवस्मारकांवर अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुका, व्याख्याने आणि शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ऐतिहासिक स्थळांवर तसेच शिवस्मारकांवर अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. “दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग नमन करतो. त्यांचे शौर्य आपल्याला सदैव प्रेरणा देईल. त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल.” असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...

