AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salim Khan health: सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर! मध्यरात्री सलमान खान रुग्णालयात

Salim Khan health Update: सलीम खान यांची तब्येत आता कशी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सलमान खान मध्यरात्री रुग्णालयात जाताना दिसला. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Salim Khan health: सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर! मध्यरात्री सलमान खान रुग्णालयात
Salman khanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 19, 2026 | 11:58 AM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज स्क्रिप्ट रायटर सलीम खान यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. अचानक रुग्णालयामध्ये आणल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. चाहते आणि जवळचे लोक त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान सलमान खान देखील उशिरा रात्री रुग्णालयात पोहोचले आणि त्यांची तब्येत जाणून घेतली. आता सलीम खान यांची प्रकृती कशी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मध्यरात्री सलमान खान रुग्णालयात

सलमान खान वडिलांना भेटल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. बाहेर पडताना सलमान खानच्या आजूबाजूला बॉडीगार्ड होते. त्यांनी टी-शर्ट आणि कॅप घातली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना माध्यमांशी बोलण्याशिवाय थेट सलमान आपल्या गाडीकडे निघाला. मान खाली घालून तो वेगाने गाडीत बसला आणि तेथून निघून गेला. नंतर तो गाडीच्या आत बसून काही क्षण इकडे-तिकडे पाहताना दिसला. त्यानंतर त्याची गाडी रुग्णालय परिसरातून बाहेर पडली. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

मायनर ब्रेन हॅमरेजची समस्या

समोर आलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना सकाळी सुमारे ८.३० वाजता कुटुंबातील डॉक्टर संदीप चोपडा यांनी रुग्णालयात आणले होते. त्यांना तात्काळ इमर्जन्सी केअर देण्यात आली आणि पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचा ब्लड प्रेशर अचानक खूप वाढला होता. यामुळे मेंदूच्या उजव्या बाजूची नस फुटल्याने हलका अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यांचे उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अधिकृत निवेदन दिले होते, ज्यात त्यांची स्थिती सांगितली. सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.

डॉक्टरांनी पुढे म्हटले, ‘वय लक्षात घेता रिकव्हरीला थोडा वेळ लागू शकतो’. सध्या न्यूरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन यांची टीम सतत त्यांच्या स्थितीवर नजर ठेवून आहे. वडिलांची तब्येत बिघडल्याची बातमी मिळताच सलमान खान शूटिंग सोडून मुंबईला परत आली. त्याची बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य देखील रुग्णालयात पोहोचले. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोक त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Follow Us
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला