उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
नुकतंच ऑपरेशन टायगर झालं आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानातून प्रवास पहायला मिळत आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे, मात्र त्याचवेळी भाजपावर ठाकरे गटाकडून टीका करणं टाळलं जात असल्याचं देखील दिसून येत आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईहून नागपूरला रवाना होणाऱ्या विमानात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तादोंलन देखील केलं आहे. त्यांच्यात काहीशी बातचीत झाल्याचंही सांगितलं जात आहे.
Published on: Jun 26, 2026 07:24 PM
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...

