Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा…
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील (UBT) सहा खासदारांच्या बंडानंतर त्याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे सध्या ठाकरेंच्या सभेला राजकीय दृष्टाय महत्त्वाचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शिवसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षातील (UBT) सहा खासदारांच्या बंडानंतर त्याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे सध्या ठाकरेंच्या सभेला राजकीय दृष्टाय महत्त्वाचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शिवसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. या सभेनंतर ठाकरे सेनेची धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी होणार असल्याचा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे सभेत ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल नेमकं काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबतीत ओमराजेंचे निकटवर्तीय आणि मित्र असेलेले नेते आणि आमदार कैलास पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. कैलास पाटील म्हणाले, या सभेनंतर धाराशिवमध्ये ठाकरे गटाची पुनर्बांधणी होणार, एकजुट होईल. सभेनंतर कार्यकर्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत उघडपणे भूमिका मांडतील, असेही आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धाराशिवमध्ये होणाऱ्या या सभेसाठी गावागावांतून शिवसैनिक तयारीला लागले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा विश्वास ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कैलास पाटलांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jun 26, 2026 05:31 PM
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...

