फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह… पहा व्हिडीओ
सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आजपासून 27 जून रोजी यवतमाळ येथून आपल्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आजपासून 27 जून रोजी यवतमाळ येथून आपल्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
‘खासदार गेले तरी निष्ठावान शिवसैनिक आपल्यासोबत आहेत’, असा संदेश देत उद्धव ठाकरे यांनी फुटीरांवर निशाणा साधला. जे खासदार निवडून आले ते ठाकरे यांच्या नावावर आणि शिवसैनिकांच्या मेहनतीवर आले होते, असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुका लक्षात घेता संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश मानला जात आहे.
दरम्यान, ओमराजेंचे निकटवर्तीय कैलास पाटील यांनी आपण ठाकरेंचा पक्ष सोडून कुठेच जाणार नाही, असं सांगितलं. इतकेच नाही तर त्यांनी धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या दोऱ्याची जय्यत तयारी असल्याचं सांगितलं.
Published on: Jun 27, 2026 09:51 AM
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...

