Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच…
ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण अगदी ढवळून निघालं होतं. आता याप्रकरणीच ठाकरे गटातील अरविंद सावंत यांचा राग उफाळला आहे.
ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण अगदी ढवळून निघालं होतं. आता याप्रकरणीच ठाकरे गटातील अरविंद सावंत यांचा राग उफाळला आहे. माध्यमांसमोर त्यांनी फुटीर खासदारांना खूप सुनावलं आहे. त्यांनी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांसाठी ‘गद्दार’ हा शब्द न वापरता ‘व्याभिचारी लोक’ असा शब्दप्रयोग केला. ते म्हणाले, ‘गद्दार’ शब्द आता बोथट वाटू लागला आहे.
पुढे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले तसेच उद्धव ठाकरेंच्या यवतमाळ दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, यवतमाळकरांसाठी त्यांचा खासदार बंडखोरी करणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. याआधी तेथील नागरिकामार्फत असं घडलं नव्हतं. त्यामुळे माझं नेहमीच म्हणणं राहिलं आहे की, कायद्यात योग्य बदल व्हावा… ज्यांना जिथं शेण खायला जायचंय त्यांनी जा, मात्र राजीनामा देऊन. एकूणच हे बंड करणारे खासदार विकाऊ होते, आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शिवसेनेची पुनर्बांधणी होणार.
Published on: Jun 27, 2026 10:56 AM
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,

