AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात कोरोनाचे विषाणू कसे आले?

Corona : नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 31, 2020 | 6:08 PM
Share

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (How Corona Entered In Navi Mumbai) नवी मुंबई शहरात कोरोनाचे विषाणू कसे आले? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना पालिका प्रशासनातर्फे त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना नवी मुंबई शहरात 10 जणांपर्यंत कसा पसरतो? या प्रश्नांची उत्तरं मिळवताना कोरोना टाळण्यासाठी काय करायला हवं याचीही उत्तरं मिळत जातात. लॉकडाऊनमध्ये घरीच बसून ही साखळी तोडण्यास कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तर नवी मुंबईत पोहोचलेल्या कोरोनाचा (How Corona Entered In Navi Mumbai) प्रवास सगळ्यांनी वाचायलाच हवा.

फिलिपिन्सचे काही नागरिक वाशी येथील नूर माशीदला 3 मार्चला भेट देतात. या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था मशीदीतर्फे करण्यात येते. त्यापैकी काही जण 5 मार्चला दिल्लीला जातात. त्यानंतर दिल्लीला गेलेले फिलिपिन्सचे नागरिक 10 मार्चला परत नूर मशीदमध्ये येतात. फिलिपिन्सवरुन आलेल्या या 10 जणांच्या गटातील एका 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत होतो. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात येतं आणि डॉक्टर तपासणीनंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात पाठवतो. कस्तुरबा रुग्णालयात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतं आणि अशाप्रकारे हा कोरोना विषाणू नवी मुंबईत प्रवेश घेतो.

त्यानंतर वाशी आणि दिल्लीत या गटाने वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या. तसेच, या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

त्याच दरम्यान, फिलिपीन्सच्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच, त्याच्या 3 साथीदारांनाही कोरोनाची लागण झाली. या चार कोरनाबाधित फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आलेल्या मशीदीचे मौलवींचाही आरोग्य तपासणी अहवाल कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आला. यामध्ये मौलवींनाही (How Corona Entered In Navi Mumbai) कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

महानगर पालिकाचे आरोग्य अधिकारी मौलवींना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात घेऊन जाण्आसाठी आले, त्यावेळीसोबत असलेल्या डॉक्टरांना शिवीगाळ करण्यात आला होता. परंतू डॉक्टरांनी पोलिसांच्या साहाय्याने मौलवीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं. त्याचबरोबर मौलवीच्या कुटुंबातील तिघांचीही तपासणी करण्यात आली आणि हे तिघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

हे सगळे फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आले होते. ते जसे लोकांना भेटले तसा कोरोनाही पसरला. मंगळवारी दोघांचे आरोग्य अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता नवी मुंबईत एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये मौलवीची गाडी ठीक करणाऱ्या एका गॅरेज चालकाचाही समावेश आहे. हे गॅरेज चेंबूरमध्ये आहे.

यासंबंधी नवी मुंबई महानगरपालिका तर्फे बीएमसीला एक पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये कोरोनाची साखळी कशी असते, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण देण्यात आलं आहे.

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

  • 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
  • 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
  • 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
  • 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
  • 10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून (Philippines Corona Patient Dies) मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
  • 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
  • 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
  • 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
  • 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
  • 17 मार्च – 59 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
  • 23 मार्च – फिलिपिन्सच्या कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू

How Corona Entered In Navi Mumbai

संबंधित बातम्या :

खासगी रुग्णालयातील कोरोना विभागात वावर, नालासोपाऱ्यात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

केवळ महिन्याचा नको, माझा वर्षाचा पगार घ्या, ‘कोरोना’ लढ्यासाठी आव्हाडांचा सढळ हात

Corona : कोरोनाची धास्ती! ‘कॉमन मॅन’लाही मास्क घातला

Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबलीx

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं