Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली

मंगल कार्यालायांनी अॅडव्हान्स रक्कम परत न केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले आहेत.

Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली

वर्धा : जिल्ह्यात लग्नसराईसाठी वधू-वरांच्या रेशीमगाठी ठरल्या. लॉकडाऊनमुळे (Marriage Postponed During Lockdown) मात्र या लग्नांवर गदा आली. काहींनी लग्न पुढे ढकलले आहेत, तर काहींनी जमावबंदीचा नियम पाळत घरातच लग्न आटोपले. परंतु ज्यांच्या लग्न सोहळ्याचा बोजवारा उडाला त्यांना मंगल कार्यालयाने बुकिंगसाठी दिलेले अॅडव्हान्स रक्कम परत करावे, असे आदेश वर्ध्याचे जिल्हाधिकारी (Marriage Postponed During Lockdown) विवेक भिमनवार यांनी काढले आहेत.

तसेच, रक्कम परत न करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. वर्धा जिल्हा प्रशासन असा आदेश काढणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ठरला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची राष्ट्रीय आपत्ती जाहीर होताच कलम 144 लावण्यात आले होते. अशा परिस्थितीत लग्न सोहळा होणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्न सोहळे रद्द करण्यात आले. अनेक कुटूंबांनी घरातच पाच लोकांमध्ये लग्नाचे सोपस्कार पार पाडले.

यादरम्यान उपस्थितांना नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात ग्रमीण भागात असे अनेक लग्न पार पडले. तर काही नागरिकांनी आपल्या घरचे लग्नकार्य पुढे ढकलले. ज्यांच्या घरचा लग्न सोहळा निश्चित झाला होता. अशा नागरिकांनी लॉन आणि मंगल कार्यालयात बुकिंग केली होती.

आता लग्नच रद्द झाले, त्यामुळे अनेकांना आपण मंगल कार्यालयाला दिलेल्या बुकिंग ऍडव्हान्स परत मिळण्याची अपेक्षा असताना काही मंगल कार्यालये बुकिंग रक्कम देण्यास (Marriage Postponed During Lockdown) टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली. ही माहिती जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत जिल्हा प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

मंगल कार्यालायांनी अॅडव्हान्स रक्कम परत न केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले आहेत. आदेश असताना देखील मंगल कार्यालायाचे मालक अथवा व्यवस्थापन रक्कम परत करीत नसेल तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे अनेक कुटुंबाना या लॉकडाऊनच्या काळात दिलासा मिळाला आहे. राज्यात अद्याप असा निर्णय अथवा आदेश कोणत्याही जिल्हा प्रशासनाने (Marriage Postponed During Lockdown) काढलेला नाही.

संबंधित बातम्या :

घाबरु नका रस्त्यावर आपला ‘विठ्ठल’ उभा आहे, छोटा पुढारी घनश्याम दरोडेचं नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

Corona : कोरोनाची धास्ती! ‘कॉमन मॅन’लाही मास्क घातला

कोरोना बरा करण्यासाठी सल्ला देणं महागात, संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात दररोज 10 लाख लिटर दूधाची खरेदी करणार

Published On - 4:59 pm, Tue, 31 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI