घाबरु नका रस्त्यावर आपला 'विठ्ठल' उभा आहे, छोटा पुढारी घनश्याम दरोडेचं नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडेने नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान घरात राहण्याचे आवाहन (Ghanshyam darode on corona)  केले आहे.

घाबरु नका रस्त्यावर आपला 'विठ्ठल' उभा आहे, छोटा पुढारी घनश्याम दरोडेचं नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडेने नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान घरात राहण्याचे आवाहन (Ghanshyam darode on corona)  केले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला. मात्र या लॉकडाऊन दरम्यानही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना (Ghanshyam darode on corona) दिसतात.

“सध्याच्या परिस्थितीत सर्व मंदिर बंद आहेत. अशा कठीण काळात रस्त्यावर आपला विठ्ठल म्हणजे पोलीस उभा आहे. या विठ्ठलरुपी पोलिसांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे”, असं छोटा पुढारी घनश्याम दरोडेने सांगितले.

“घाबरु नका, चिंता करू नका, सतर्क रहा आणि काळजी घ्या, सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करुन घरात सुरक्षित रहा”, असंही घनश्यामने सांगितले.

घनश्याम म्हणाला, “स्वच्छ पाणी आणि साबणाने वारंवार हात धुऊन काळजी घ्या. अशा कठीण प्रसंगी रस्त्यावर दिवस-रात्र उभे असणारे पोलीस, रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.”

“आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संकट हटवणार आहोत. तुम्ही फक्त लॉकडाऊनच्या काळात सर्वांनी घरातच राहावे. सर्दी खोकला ताप अशी काही लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्या”, असा सल्लाही यावेळी घनश्यामने दिला.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 232 वर पोहोचली आहे. त्यासोबत अनेक संशयितांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर देशाता कोरोना रुग्णांची संख्या ही 1300 वर पोहोचली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *