AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारा दिवसात त्याने ताजनंतर चित्रित होणाऱ्या इमारतीचे मॉडेल साकारले

विशेष म्हणजे अवघ्या 12 दिवसात हे किचकट काम त्याने लिलया पूर्ण केले आहे. त्याची ही नयनरम्य कामगिरी आता सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरी प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. 

बारा दिवसात त्याने ताजनंतर चित्रित होणाऱ्या इमारतीचे मॉडेल साकारले
aakash (1)Image Credit source: aakash (1)
| Updated on: Jan 09, 2023 | 11:14 AM
Share
मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय ( Central_railway ) असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT ) या देखण्या इमारतीची तितकीच देखणी प्रतिकृती एका पंचवीस वर्षांच्या इंजिनिअर तरूणाने अवघ्या 12 दिवसात तयार केली आहे. आकाश कांबळे असे त्याचे नाव असून रेल्वे गाड्या आणि इंजिनांचे आकर्षक मॉडेल बनविण्याचा छंदच त्याला जडला आहे.
अंबरनाथ येथे राहणाऱ्या  25 वर्षीय आकाश कांबळे या तरूणाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान प्राप्त असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे कार्डबोर्डपासून हुबेहुब मॉडेल तयार केले आहे.
विशेष म्हणजे अवघ्या 12 दिवसात हे किचकट काम त्याने लिलया पूर्ण केले आहे. त्याची ही नयनरम्य कामगिरी आता सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरी प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे.
आकाश याने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून मॅकेनिकल इंजिनिअर डिग्री घेतली आहे, त्याने मोनोरेलच्या स्थानकात स्टेशन मॅनेजर म्हणून जॉबही केला आहे.
आकाश याला पू्र्वीपासूनच ट्रेन आणि इंजिनच्या विविध छोट्या प्रतिकृती तयार करण्याचा छंद आहे. मात्र,लॉकडाऊनमध्ये त्याने अधिक कसोशीने हे तंत्र आत्मसात केल्याचे तो सांगतो. सीएसएमटी इमारतीचे मॉडेल तयार करण्यासाठी आपण सनबोर्ड आणि कार्डबोर्डचा वापर केल्याचे तो सांगतो.
यापूर्वी त्याने डेक्कन क्वीन तसेच एसी लोकल तसेच विविध ट्रेन इंजिन्सची मॉडेल्स तयार केली आहेत. आपण कार्डबोर्ड तसेच धातूचाही वापर मॉडेल बनविण्यासाठी केल्याचे आकाश याने सांगितले.

ब्रिटीशकाळात 1888 मध्ये आर्कीटेक्ट एफ.डब्ल्यू. स्टीव्हन यांनी ही इमारत बांधली होती. या इमारतीचे मॉडेल बनविण्याचे माझे स्वप्न होते. ते मी 12 दिवसांत पूर्ण केल्याचे आकाश याने टीव्ही नाइन मराठीशी बोलताना सांगितले.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा