AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’ 27 सेकंदाचा व्हिडीओ; जयंत पाटील 15 दिवसांनी मैदानात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोनातून बरे झाले आहेत. (jayant patil discharged after recovery from COVID-19)

VIDEO: 'तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे...' 27 सेकंदाचा व्हिडीओ; जयंत पाटील 15 दिवसांनी मैदानात
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
| Updated on: Mar 08, 2021 | 11:53 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोनातून बरे झाले आहेत. तब्बल 15 दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली असून कामकाजाला सुरुवातही केली आहे. पाटील यांच्या समर्थकांनी मात्र, त्यांच्या दमदार एन्ट्रीचा एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार करून फेसबुकवर टाकला असून हा व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे. (jayant patil discharged after recovery from COVID-19)

जयंत पाटील यांनी काल ट्विट करून ते कोरोनातून मुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ पूर्ण करत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहे. या काळात मुंबई महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत मी आभारी आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, चाचण्या करून घ्याव्यात. योग्य औषधोपचार घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टायगर अभी जिंदा है, पाटील आणि फडणवीस

जयंत पाटील यांच्या चाहत्याने एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्याला टायगर अभी जिंदा है असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओत जयंत पाटील समर्थकांसह चालताना दिसत आहेत. तसेच विधानसभेत आणि सभागृहात बोलताना दिसत आहेत. तर मध्येमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो दाखवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे

पाटील यांच्या या दमदार एन्ट्रीच्या व्हिडीओमध्ये ‘मांझी- द माउंटेन मॅन’ या सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा एक डायलॉगही आहे. पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना बॅकग्राऊंडला, ‘ले फिर आ गए… सब राजी खुशी हां… तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे… गलत… जब तक तोड़ेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं, बहुतै बड़ा दंगल चलेगा रे तोहर हमार…’ हा संवाद दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा डायलॉग सुरू असताना पाटील यांच्यासोबतच फडणवीस यांचेही फोटो दाखवण्यात आला आहे. हे सर्व डायलॉग फडणवीस यांनाच उद्देशून म्हटल्याचं दिसत आहे.

पाटील आला, पाटील आला…

‘मांझी- द माउंटेन मॅन’ या सिनेमातील संवाद संपताच ‘पाटील आला, पाटील आला…’ हे गाणं ऐकायला मिळतं. गाड्यांच्या ताफ्यातून पाटील येत असून बॅकग्राऊंडला हे गाणं वाजत असल्याचा हा प्रसंग दाखवण्यात आलं आहे. पाटील आता बरे झाले आहेत आणि आता ते पुन्हा दमदारपणे कामाला लागतील, असंच या गाण्यातून सूचवण्यात आलं आहे. (jayant patil discharged after recovery from COVID-19)

संबंधित बातम्या:

International Women’s Day 2021: कोणाचंही प्यादं बनून राहू नका, निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हा, बदल घडवा: राज ठाकरे

भाजपची मातृसंस्था लग्नाला कंत्राट मानते, त्यावर तुमचं म्हणणं काय?; नाना पटोलेंचा सवाल

International Women’s Day 2021 | महिला दिनाचा उत्साह, सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

(jayant patil discharged after recovery from COVID-19)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.