AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी येतोय, चॅलेंज आहे, रोखून दाखवाच; किरीट सोमय्यांचे थेट हसन मुश्रीफ यांनाच आव्हान

छोट्या कंपनीला 1500 कोटींचे टेंडर दिले आहे. ते कसे दिले? आता कारवाई सुरू आहे. सगळे पेपर, डॉक्युमेंट समोर आहेत. या संबंधित आता कारवाई होणार आहे.

मी येतोय, चॅलेंज आहे, रोखून दाखवाच; किरीट सोमय्यांचे थेट हसन मुश्रीफ यांनाच आव्हान
मी येतोय, चॅलेंज आहे, रोखून दाखवाच; किरीट सोमय्यांचे थेट हसन मुश्रीफ यांनाच आव्हानImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 12, 2023 | 10:07 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडीने छापेमारी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुश्रीफ यांना ललकारले आहे. मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मी दर्शन घेणार आहे. माझं चॅलेंज आहे. रोखायचं असेल तर रोखून दाखवा, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांना दिलं आहे. त्यामुळे सोमय्या यांना मुश्रीफ काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होतं. त्यामुळे मला रोखलं गेलं होतं. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्या जावयाची कंपनी कधी जन्माला आली? 1500 कोटींच्या कामाचे वर्क ऑर्डर आपण दिलेलं होतं. जावयाला पैसे द्यावे लागणार असे आदेश हसन मुश्रीफ यांनी काढले होते. मुश्रीफ यांचे सेक्रेटरी या घोटाळ्यात सामील आहेत. त्यांची देखील चौकशी होणार आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

छोट्या कंपनीला 1500 कोटींचे टेंडर दिले आहे. ते कसे दिले? आता कारवाई सुरू आहे. सगळे पेपर, डॉक्युमेंट समोर आहेत. या संबंधित आता कारवाई होणार आहे. मी मुस्लिम आहे म्हणून माझ्यावर कारवाई होत असल्याचं ते सांगतात. गोरगरीबांना लुटताना त्यांना धर्म आठवला नव्हता का? असा सवाल त्यांनी केला. मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही मांडावं, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेर आज शांतता आहे. काल 12 तासाहून अधिक काळ ईडीकडून कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ही कारवाई सुरू असताना मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते.

मुश्रीफ समर्थकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीही केली होती. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, आज मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर शुकशुकाट आहे.

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर