AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह जिहाद : नाव खोटं सांगून लग्न केले, हिजाब-गोमांस सक्ती,पीडीत महिलेची तक्रार

उल्हासनगरात लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या महिलेला खोटे नाव सांगून तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत तिला फसवण्यात आल्याची तक्रार तिने दाखल केली आहे.

लव्ह जिहाद : नाव खोटं सांगून लग्न केले, हिजाब-गोमांस सक्ती,पीडीत महिलेची तक्रार
love jihad in ulasnagar
| Updated on: May 19, 2026 | 5:03 PM
Share

उल्हासनगर येथे लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपीने आपले खोटे नाव सांगून एका हिंदू तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत विवाह केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.लग्नानंतर आपल्याला बिहार येथे नेऊन बुरखा आणि हिजाबची सक्ती केली, गोमांस खायला सक्ती करीत छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार,आरोपीने स्वतःचं नाव विजय वर्मा असल्याचे सांगत तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.यानंतर दोघांचा विवाह झाला.लग्नानंतर आरोपीने तिला बिहार येथे नेले, जिथे तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.तसंच तिच्यावर बुरखा आणि हिजाब घालण्याची तसेच गोमांस खाण्याची सक्ती करण्यात आली.तसंच पतीच्या कुटुंबीयांकडून मारहाण आणि विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचाही आरोप पीडित तरुणीने केला आहे.दरम्यान,या दाम्पत्याला तीन मुले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरे लग्न केल्यानंतर घराबाहेर काढले

पीडित महिलेचा आरोप केला आहे की, पतीने दुसरे लग्न केल्यानंतर तिला घराबाहेर काढले.यानंतर ती आईकडे राहत असताना देखील आरोपींकडून तोडफोड आणि त्रास दिला जात असल्याचे पीडित तरुणीने म्हटलं आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या महिलेने पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?