Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 04, 2023 | 6:36 AM

सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Latest Breaking News Live UpdatesImage Credit source: tv9 marathi

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वातावरण तापलं आहे. भाजप ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jan 2023 06:41 PM (IST)

    फ्रिजच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता

    Marathi News LIVE Update

    रेफ्रिजरेटरच्या किंमती महाग होण्याची शक्यता

    रेफ्रिजरेटर्सच्या स्टार रेटिंगसंबंधीच्या नियमातील बदलामुळे किंमतीत वाढ

    ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचा निर्णय

    स्टार रेटिंगचे सुधारित नियम लागू केले

    1 जानेवारीपासून हे नियम लागू असतील

    या बदलांमुळे रेफ्रिजरेटरच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढतील

  • 03 Jan 2023 05:39 PM (IST)

    सोने आणि चांदीच्या भावात जोरदार उसळी

    Marathi News LIVE Update

    भारतीय वायदे बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावात जोरदार उसळी

    वायदे बाजारात चांदीचा भाव आज 70,000 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक

    मंगळवारी सोन्याच्या भावात 0.67 टक्क्यांची वृद्धी

    तर चांदीचा भाव आज 1.41 टक्क्यांनी वधारला

  • 03 Jan 2023 04:48 PM (IST)

    राज्यातील वीज कर्मचारी उद्यापासून जाणार संपावर

    ठाणे : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी आज मध्यरात्री पासून जाणार संपावर,

    03 जानेवारीच्या रात्री 12 वाजल्यापासून पुढील 72 तासा साठी सर्व कर्मचारी जाणार संपावर,

    संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास कर्मचारी कामे करू शकणार नसल्याणनं नागरिक चिंतेत.

  • 03 Jan 2023 04:00 PM (IST)

    अजित पवार यांच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

    जळगाव : जळगाव शहरातील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत भाजपचा निषेध नोंदवण्यात आला,

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे अभ्यासाअंती केलेलं आहे,

    संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या भूमिकेविरोधात आंदोलन केलं,

    महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.

  • 03 Jan 2023 02:06 PM (IST)

    नाशिक- इगतपुरी- अग्निकांडानंतर तिसऱ्या दिवशीही जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत धुराचे लोळ कायम

    - धूर आणि ऑइलयुक्त केमिकलमुळे हवेत विषारी वायू तयार होण्याची शक्यता

    - जिंदाल परिसराच्या परिघातील सुमारे २० कि मी अंतरात येणाऱ्या जवळपास २५ गावांना मास्कसक्तीचे आदेश

    - बाहेर निघताना पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावे, मास्कचा वापरावा अशी दवंडी प्रत्येक गावात पेटवण्यात आली

  • 03 Jan 2023 01:12 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या जवळपास 40 ते 45 बस बंद स्थितीत

    मागील 20 दिवसांपासून एसटीच्या स्पेअर पार्ट साठी पैसेच आले नाही,

    भंगार बस मूळे बसचा अपघात होण्याची शक्यता,

    अनेक गाड्या 10 वर्षापेक्षा अधिक चालल्याने खराब होत आहे,

    एसटी महामंडळच्या अधिकारी यांनी केली आहे नवीन बसची मागणी,

    एकट्या अमरावती आगारातील सहा शिवशाही बस बंद.

  • 03 Jan 2023 12:40 PM (IST)

    पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

    ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये झालं निधन

    कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जमायला सुरुवात

    मंत्री तानाजी सावंत हॉस्पिटलमध्ये आलेत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष्मण जगतापांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार

  • 03 Jan 2023 12:08 PM (IST)

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैचारिक मतभेद उघड

    जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी केला विरोध,

    औरंगजेब हा क्रूरच होता आणि हिंदू द्वेष्टा होता,

    शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार वेगळेच आहेत,

    अंबादास दानवे यांचं जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण.

  • 03 Jan 2023 11:59 AM (IST)

    भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचे पार्थिव दुपारी दोन वाजता घरी आणलं जाईल.

    सायंकाळी सहापर्यंत त्यांच्या पिंपळे गुरव येथील राहत्या घरी अंत्यदर्शन होईल.

    सायंकाळी सात वाजता गावातीलच स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडतील.

  • 03 Jan 2023 11:18 AM (IST)

    लक्ष्मण जगताप यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून श्रद्धांजली

    चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.

    सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

  • 03 Jan 2023 11:16 AM (IST)

    पुणे- पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

    पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

    लोकप्रिय नेत्याच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा

    दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही विधानपरिषद, राज्यसभा निवडणूकीवेळी मतदानाचा बजावला होता हक्क

    काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष ते भाजप आसा जगताप यांचा राजकीय प्रवास

  • 03 Jan 2023 10:16 AM (IST)

    बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि पार्थ पवार एकत्र

    बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि पार्थ पवार एकत्र

    सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीला शरद पवार,पार्थ पवार यांची भेट

    यावेळी डेअरीच्या कामकाजाची शरद पवार माहिती घेणार

  • 03 Jan 2023 10:01 AM (IST)

    चार जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या घरात घुसून साहित्याची केली तोडफोड

    नाशिकच्या नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरातील घटना,

    संशयित आरोपींनी घराबाहेरील रिक्षाची देखील केली तोडफोड,

    महिलेच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

    साहित्याची तोडफोड करून टोळके फरार.

  • 03 Jan 2023 09:41 AM (IST)

    हिंदूमहासंघ जितेंद्र आव्हाड यांना पाठविणार पुस्तक

    बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव छत्रपती हे पुस्तक देणार भेट

    भोसले घराण्याचा इतिहास कळावा म्हणून हे पुस्तक भेट करणार

    औरंगजेबावर आव्हाडांनी केलेले वक्तव्य चांगलेच पेटले आहे

  • 03 Jan 2023 09:30 AM (IST)

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

    जयंती निमित्त सावित्री माईंच्या गावी नायगावात दिंडीचं अयोजन

    सावित्री बाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करुन दिंडीला सुरुवात

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

    ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री  शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  • 03 Jan 2023 09:10 AM (IST)

    पुणे- डॉ. बाबा आढाव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

    भिडे वाड्याचं काम लवकरात लवकर करा

    अन्यथा पुन्हा चळवळ करणार

    हा वाद कोर्टात आहे असं खोटं सांगितले जातंय - डॉ. आढाव

    महापालिकेनं लवकरात लवकर इथलं काम पूर्ण करण्याची मागणी

  • 03 Jan 2023 09:04 AM (IST)

    डॉक्टरांच्या संपाचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयावर गंभीर परिणाम

    डॉक्टरांच्या संपाचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयावर गंभीर परिणाम

    डॉक्टर संपावर गेल्यामुळे घाटी रुग्णालयातील 16 शस्त्रक्रिया

    अपघात विभागातील 103 शस्त्रक्रिया खोळंबल्या

    तर तब्बल 1200 डॉक्टर तपासण्या खोळंबल्या

    डॉक्टरांच्या संपाच्या घाटी रुग्णालयातील रुग्णावर गंभीर परिणाम

  • 03 Jan 2023 08:15 AM (IST)

    जे पी नड्डा यांच्या सभेवर शिवसेनेचे कीर्तन पडले भारी

    जे पी नड्डा यांच्या सभेवर शिवसेनेचे कीर्तन पडले भारी

    जे पी नड्डा यांच्या सभेतून नागरिकांनी घेतला काढता पाय

    तर बजाजनागरातील शिवसेनेच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी

    औरंगाबाद शहरात शिवसेना आणि भाजप मध्ये कीर्तन आणि सभेवरून जोरदार चर्चा

  • 03 Jan 2023 08:04 AM (IST)

    औरंगाबाद- कोरोना लसीचे 14 हजार डोस झाले एक्सपायर..

    शासनाला वारंवार सांगूनही शासनाने परत घेतला नाही कोरोना लसींचा साठा..

    औरंगाबाद येथे नागरिकांना देण्यासाठी मनपाकडे एकही लस नाही शिल्लक..

    राज्य शासनाने एक्सपायर होणारा साठा परत घेतला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे मत..

    जुना साठा घेतला तर नाहीच ,मात्र नवीन साठाही दिला नाही..

    शासनाने डोस परत न घेतल्याने 14,000 डोस गेले वाया..

  • 03 Jan 2023 08:03 AM (IST)

    नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची नवी योजना

    नाशिक : चार मल निस्सारण केंद्राच्या क्षमता वाढीसाठी 530 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला सादर,

    राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत निधी मिळविण्यासाठी मनपाचा प्रयत्न,

    याअगोदर देखील अमृत-2 योजनेतून 332 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे,

    या दोन्ही योजनांपैकी एका योजनेतून निधी मिळण्याची शक्यता.

  • 03 Jan 2023 07:46 AM (IST)

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती

    जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन

    नायगाव फुलं-रांगोळ्यांनी सजलं

    गावातील अनेक घरावर उभारली गुडी

    नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकदेखील सजलं

    स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील नायगाव येणार

  • 03 Jan 2023 07:44 AM (IST)

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती

    आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस

    पुण्यातील महात्मा फुले वाड्याला आकर्षक अशी रोषणाई

    महात्मा फुलेवाडा रोषणाईने उजळला आहे

    फुले दाम्पत्याला मानणारा वर्ग सावित्रीबाईंना अभिवादनासाठी फुलेवाडा, समता भूमी या ठिकाणी येत आहे.

Published On - Jan 03,2023 7:39 AM

Follow us
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.