AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंसेचा मार्ग सोडा, नक्षलवाद्यांनो विकासाच्या मुख्य प्रवाहात या, नाहीतर तुमचा बिमोड करणारच : एकनाथ शिंदे

कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची छाती अभिमानाने फुलून आली आहे.

हिंसेचा मार्ग सोडा, नक्षलवाद्यांनो विकासाच्या मुख्य प्रवाहात या, नाहीतर तुमचा बिमोड करणारच : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे, गडचिरोली पालकमंत्री
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Nov 14, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं त्यांनी मनापासून अभिनंदन करत विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा निर्धार यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करेल.

कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाच्या जवानांनी शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  गडचिरोली पोलिस आणि सी 60 जवानांचं मनापासून अभिनंदन. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं देखील हे मोठं यश आहे, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

पोलिस आणि नक्षली चकमकीत कारवाईत चार पोलिसही जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असा निश्चय यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं

गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाचं धोरण आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात नक्षलवाद्यांनी यावं, असं पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.

नलक्षवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे ठार?

या मोहिमेत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली असून पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

मिलिंद तेलतुंबडे कोण आहे ?

मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.

26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात उडालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

हे ही वाचा :

Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...