Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 13, 2021 | 8:26 PM

Milind Teltumbde Killed | कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन
MILIND TELTUMBDE

Follow us on

गडचिरोली : कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलेय. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

पोलिसांना मोठे यश, नक्षली चळवळ खिळखिळी 

आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला असल्याची माहिती मिळतेय. या वृत्ताला पोलिसांनी दुजारा दिलेला नाही. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली असून पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

मिलिंद तेलतुंबडे कोण आहे ?

मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.

26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात उडालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

इतर बातम्या :

मी अजूनही कागद पेनानेच लिहितो… भूमिका मांडणाराच खरा संपादक.. पत्रकारितेविषयी काय म्हणाले ‘सामना’चे संपादक?

पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ‘बीजमाता’ राहीबाईंचा कृषी क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास

डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप

बातमी आताच ब्रेक केली आहे. अपटेडसाठी रिफ्रेश करत राहा..

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI