मी अजूनही कागद पेनानेच लिहितो… भूमिका मांडणाराच खरा संपादक.. पत्रकारितेविषयी काय म्हणाले ‘सामना’चे संपादक?

पत्रकाराने नेहमी लिहितं रहावं, असं बोलताना संजय राऊत म्हणाले, संपादकानेही आपली भूमिका सातत्याने वृत्तपत्रातून अथवा आपल्या माध्यमातून लावू धरावी. जो भूमिका मांडत नाही, तो संपादक होण्याच्या लायकीचा नाही.

मी अजूनही कागद पेनानेच लिहितो... भूमिका मांडणाराच खरा संपादक.. पत्रकारितेविषयी काय म्हणाले 'सामना'चे संपादक?
पत्रकार आणि आजच्या पत्रकारितेविषयी संजय राऊत यांचा औरंगाबादेत मुक्तसंवाद!
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 6:31 PM

औरंगाबादः शहरातील एमजीएम विद्यापीठात (MGM University) आयोजित केलेल्या मुक्त संवादात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारितेविषयीच्या विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. तसेच विद्यापीठात त्यांनी कशा प्रकारे शिक्षण घेतले, याविषयीचे अनुभव शेअर केले. यावेळी सामना या वृत्तपत्रातून चालवलेल्या लेखमालिकेविषयी त्यांनी सांगितले. तसेच आजच्या पत्रकारितेविषयीदेखील भाष्य केले.

नॅशनल हेरॉल्डनंतर सामनाच!

वृत्तपत्रांच्या इतिहासाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचं मुखपत्र ‘सामना’ एवढं प्रसिद्ध झालेलं मी अद्याप पाहिलेलं नाही. स्वातंत्र्यापूर्वी पंडित नेहरूंनी नॅशनल हेरॉल्ड काढलं होतं. त्याला हे स्थान होतं. स्वातंत्र्यानंतर फक्त सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला हे स्थान मिळालं आहे. आजही सामनाचे अग्रलेख पाहून अनेकांच्या हेडलाइन्स ठरतात.

मला फक्त कागदावरच सूचतं…

लिहिण्याविषयी संजय राऊत म्हणाले की, मला अजूनही लॅपटॉपवर लिहिता येत नाही. मी फक्त कागदावरच लिहितो. कुठेही असलो तरीही कागद-पेन हाती घेतल्याशिवाय मला सूचत नाही. मला याचं फार वाईटही वाटत नाही. जी स्थिती आहे, ती लोकांनी स्वीकारली आहे. त्यामुळेच माझ्या शब्दांना आज मान आहे.

भूमिका मांडणारा तोच संपादक.. अन्यथा लायकीच नाही!

पत्रकाराने नेहमी लिहितं रहावं, असं बोलताना संजय राऊत म्हणाले, संपादकानेही आपली भूमिका सातत्याने वृत्तपत्रातून अथवा आपल्या माध्यमातून लावू धरावी. जो भूमिका मांडत नाही, तो संपादक होण्याच्या लायकीचा नाही. त्यांनी मत मांडलंच पाहिजे. नंतर लोक बघतील, हे मत स्वीकारायचं की नाही…

रेडिमेड फाइल व आजची शोधपत्रकारिता

महाराष्ट्रातील आजच्या पत्रकारितेबद्दल बोलताना संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आजचे महाराष्ट्रातले चित्र दुःखद आहे. असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता. आज ‘रेडिमेड’ फाईल मिळते.. वाजवा.. म्हणून सांगितलं जातं. बातमी तयार करून दिली जाते. त्यामुळे आता पूर्वीसारखी शोधपत्रकारिता राहिली नाही, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन

लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.