औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन
संजय राऊत यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:38 PM

औरंगाबादः वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या आक्रोश (Shivsena Morcha) मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात हा विशाल मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे (Aurangabad politics) मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेकडो शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौकातून गुलमंडीकडे निघाला आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याकरिता केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

मराठवाड्यात आंदोलनाची ठिणगी- संजय राऊत

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबदमध्ये शिवसेनेचा मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महागाईच्या विरोधात आम्ही चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. या आंदोलनाचा प्रसार संपूर्ण देशात होणार आहे. मराठवाड्यात फक्त या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आता हे लोण संपूर्ण देशभर पसरेल. देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्याच्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. याची सुरुवात औरंगाबादमध्ये होत आहे.

औरंगाबादमध्ये शिवसेना नेत्यांची उपस्थिती

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे यांचीही उपस्थिती दिसून आली. यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आंदोलनावर टीका केली आहे. शिवसेनेची ही भंपकगिरी असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

इतर बातम्या-

ज्या रझा अकादमीवर बंदीची मागणी केली जातेय, त्यांच्या दंगलीमुळे महाराष्ट्राच्या डॅशिंग IPS अधिकाऱ्याचं करिअर उतारणीला लागलं माहिती आहे? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.