डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप

विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्यावर आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप
yavatmal medical college
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 7:30 PM

यवतमाळ: डॉ. अशोक पाल हत्याकांड प्रकरणानंतर यवतमाळ शाककीय वैद्यकीय माहविद्यालयातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज या विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्यावर आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

डॉ. कांबळे यांच्यावर काय आरोप केले ?

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्या विरोधात आर्थिक शोषणाचे आरोप केले. मेडिकल ऑफिसर पोस्टिंगसाठी 50 हजार आणि इंटर कम्प्लिशनसाठी 15 हजार रुपये हॉल तिकीटसाठी 5000 रुपये मागितले जातात, असे विद्यार्थ्यांनी म्हैसैकर यांना सांगितले. तसेच होस्टेलसाठी 15 हजार मागितले जातात अशी व्यथादेखील विद्यार्थ्यांनी मांडली.

250 विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीसाठी निवेदन

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ विद्यार्थी डॉ. अशोक पाल यांची 11 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. येथील 250 विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीकरिता म्हैसेकर यांना निवेदन दिले आहे.

पेट्रोलिंग कार हवी, नियमित डीन असावेत, पोलीस सुरक्षा गार्ड पाहिजे

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पेट्रोलिंग कार हवी, नियमित डीन असावेत, पोलीस सुरक्षा गार्ड पाहिजे अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच येथे मुली असुरक्षित आहेत. येथे बेसिक मेडिसीन उपलब्ध नाहीयेत. ग्लोज लिहून द्यावे लागतात. तसेच विद्यालयातील एक्सरे बंद आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग नाही अशा समस्या विद्यार्थ्यांनी म्हैसेकर यांना सांगितल्या.

डॉ. अशोक पाल यांची हत्या कशी झाली ?

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाविद्यालयात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता. मात्र या ठिकाणी शहरातील कॅम्पस बाहेरील काही व्यक्ती या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्यात आणि शिकाऊ डॉक्टरांमध्ये वाद झाला होता. हे बाहेरील व्यक्ती मुलींच्या वसतिगृहाजवळ लघुशंका करत होते. त्यातून या वादाला सुरुवात झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. याच वैमनस्यातून काल रात्री 10 वाजताच्या सुमारास लायब्ररीमधून अशोक हॉस्टेलकडे जात असताना दोन ते तीन अज्ञात मारेकऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत निर्मनुष्य जागी नेत अशोकवर धारधार शास्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोकचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला.

इतर बातम्या :

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

ST Strike: परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक; कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, पुन्हा एक चर्चेची फेरी

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.