वडील रिक्षा चालवता चालवता गेले, मामानं कष्टानं डॉक्टर बनवलं, अशोक पालच्या हत्येनं महाराष्ट्रला हुरहुर

वडील रिक्षा चालवता चालवता गेले, मामानं कष्टानं डॉक्टर बनवलं, अशोक पालच्या हत्येनं महाराष्ट्रला हुरहुर
यवतमाळमधील डॉ. अशोक पाल हत्याकांडाचा उलगडा

रुग्णालयात स्ट्रीटलाईट नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना नाही. त्यामुळे ही घटना घडली याला जबाबदार डीन असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सदर प्रकरणाची प्रशासकीय जबाबदारी व आंदोलकांचा रोष लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्य आयुक्त यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.

विवेक गावंडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Nov 11, 2021 | 8:05 PM

यवतमाळ : अज्ञात कारणावरुन शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची अज्ञातांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल रात्री घडली आहे. अशोक पाल असे मयत शिकाऊ डॉक्टरचे नाव असून तो MBBS च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

केवळ तीन महिने राहिले होते स्वप्न पूर्ण व्हायला अन्…

डॉ. अशोक पाल हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अशोक वडिल रिक्षाचालक होते, दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. अशोक यांच्या घरी आई आणि दोन लहान भावंडे असा परिवार आहे. वडिलांच्या निधनानंतर अशोकचे मामा त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करीत होते. अशोक हे लहानपासून अभ्यासात हुशार होते. मोठे होऊन डॉक्टर व्हायचे असे त्यांचे स्वप्न होते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीवर मात करीत अशोक यांनी यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. डॉक्टरकीच्या अभ्यासाचे हे शेवटचे वर्ष होते. केवळ तीन महिने राहिले होते अशोक यांचे स्वप्न पूर्ण व्हायला अन् अज्ञातांनी घात केला. भविष्यातील होतकरु डॉक्टरच नाही तर कुटुंबाचा आधार मारेकऱ्यांनी हिरावला.

काय घडले नेमके?

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाविद्यालयात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता. मात्र या ठिकाणी शहरातील कॅम्पस बाहेरील काही व्यक्ती या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्यात आणि शिकाऊ डॉक्टरांमध्ये वाद झाला होता. हे बाहेरील व्यक्ती मुलींच्या वसतिगृहाजवळ लघुशंका करत होते. त्यातून या वादाला सुरुवात झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. याच वैमनस्यातून काल रात्री 10 वाजताच्या सुमारास लायब्ररीमधून अशोक हॉस्टेलकडे जात असताना दोन ते तीन अज्ञात मारेकऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत निर्मनुष्य जागी नेत अशोकवर धारधार शास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अशोकचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत 2 पथकांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुषार नागदेवते व आकाश गोफने या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करण्यामागचे नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

रुग्णालयात सुरक्षेचे तीनतेरा

रुग्णालयात स्ट्रीटलाईट नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना नाही. त्यामुळे ही घटना घडली याला जबाबदार डीन असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सदर प्रकरणाची प्रशासकीय जबाबदारी व आंदोलकांचा रोष लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्य आयुक्त यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.

अशोक यांच्या मृत्यूनंतर शिकाऊ डॉक्टर आक्रमक

दरम्यान डॉ. अशोक पाल यांच्यावरील भ्याड हल्ला आणि मृत्यू विरोधात आज सकाळपासून रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर आक्रमक झाले आहेत. त्यांनी रुग्णालयाचे सर्व गेट बंद करत आंदोलन सुरू केले. डॉ अशोक पाल यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. एकाही रुग्णाला रुग्णालयात येऊ दिले जात नाही. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे यांनी राजीनामा द्यावा, आरोपीला अटक करा अशी मागणी करण्यात आली. सुमारे 9 तासापासून डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी मध्यस्थी करत आंदोलक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असताना शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी विद्यार्थ्यांसोबत दमदाटी केली. त्यानंतर परिसरातील वातावरण चिघळले आणि आंदोलक विद्यार्थी संतप्त झाले. यानंतर शिवसेनेचे संतोष ढवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या आंदोलनाला नर्सेस संघटना, ima, सफाई कामगार संघटना यांनीही पाठिंबा दिला.

इतर बातम्या

पिंपरीत क्रिकेट मॅचच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातली बॅट ; दोघांवर गुन्हा दाखल

छेडछाडीला विरोध, महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या, आई गंभीर जखमी, वाचा हरियाणातील हत्येचा थरार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें