पिंपरीत क्रिकेट मॅचच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातली बॅट ; दोघांवर गुन्हा दाखल

तू आणि तुझ्या टीमने विजय मिळवून खेळ दाखविला आहे. मी आत्ताच जामीनावर सुटून आलोय मला दुसरा पण खेळ येतो. तुला दुसरा खेळ दाखवू का?,” असे म्हणत हातातील बॅटने 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी- चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.

पिंपरीत क्रिकेट मॅचच्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातली बॅट ; दोघांवर गुन्हा दाखल
pimpri-chinchawad police station
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:28 PM

पिंपरी – अगदी शेवटच्या टप्प्यात पोहचलेल्या टी 20 विश्वचषककडे (ICC T20 World Cup) अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या  विश्वचषकामध्ये केवळ दोन सामने शिल्लक राहिले आहेत. फायनलमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडने अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता दुसरा कोणता संघ अंतिम सामान्यता जागा मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळीकडं टी 20 विश्वचषकाची चर्चा सौर असतानाच दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट संदर्भात घडलेली घटना चर्चा विषय ठरली आहे. क्रिकेट खेळतांना झालेल्या वादातून 21वर्षीय तरुणाला मारहाण झाली आहे.

” तू आणि तुझ्या टीमने विजय मिळवून खेळ दाखविला आहे. मी आत्ताच जामीनावर सुटून आलोय मला दुसरा पण खेळ येतो. तुला दुसरा खेळ दाखवू का?,” असे म्हणत हातातील बॅटने 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी- चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. टेल्को मैदानाच्या शेजारच्या परिसरात क्रिकेट मॅचवरून झालेल्या वादावादीतून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सुवित शेट्टी नावाचा तरुण जखमी झाला आहे. सुवितच्या डोक्याला व हाताला  मार लागला आहे . उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी सलमान शेख, समीर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी सुवित शेट्टी आणि आरोपी हे टेल्को मैदाना शेजारच्या परिसरात क्रिकेट खेळत होते. जखमी सुवित आणि आरोपी विरोधी संघातून क्रिकेट खेळत होते. यादरम्यान खेळात सुवितच्या संघाचा विजय झाला व त्यांनी मैदानात जल्लोष करण्यास सुरुवात केली. विजेता संघ करत असलेल्या जल्लोषाचा आरोपींना राग आला, त्या रागातूनच आरोपींनी सुवितला मारहाण केली. आरोपी सलमान शेख आणि समीर पठाण हे मारहाण करून फरार झालेत पिंपरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई

VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.