5

छेडछाडीला विरोध, महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या, आई गंभीर जखमी, वाचा हरियाणातील हत्येचा थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर आरोपी कोट पवन हा सचिन नामक व्यक्तीसोबत बाईकवरुन फरार झाला आहे. पवनची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो या गावात 5 वर्षांपासून राहत होता, तर गेली चार वर्षे कुस्ती शिकवत होता. पवनची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे इनाम पोलिसांनी घोषित केले आहे.

छेडछाडीला विरोध, महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या, आई गंभीर जखमी, वाचा हरियाणातील हत्येचा थरार
महिला पहलवानासह भावावर झाडल्या गोळ्या
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 6:32 PM

सोनीपत : छेडछाडीला विरोध केला म्हणून महिला पहलवानासह तिच्या भावाची कुस्ती आखाड्याच्या प्रशिक्षकाने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील सोनीपत येथील हलालपूरमध्ये घडली आहे. निशा असे मयत पहलवानाचे नाव आहे. या घटनेत पहलवानची आईही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रोहतक पीजीआयमध्ये उपचार सुरु आहेत. पवन असे आरोपी कोचचे नाव आहे.

छेडछाडीला विरोध करायची निशा

हरियाणातील सोनीतपतमधील हलालपूर येथे एक रेसलिंग अॅकॅडमी आहे. जिथे मयत निशा रेसलर बनण्याचे स्वप्न बाळगून प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. येथेच तिची ओळख अॅकॅडमीचा कोच पवनशी झाली. यानंतर पवन निशासोबत छेडछाड करायचा. याला निशा विरोध करायची. निशाचे वडील दयानंद यांनी दुपारी 2.30 वाजता आपल्या मुलाला फोन केला. मात्र फोन एक अज्ञात व्यक्तीने उचलला आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे सांगितले.

मोठी रेसलर होण्याची स्वप्ने दाखवायचा पवन

निशा रेसलर होती. रेसलिंगमध्ये तिला खूप नाव कमावयाचे होते आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याचा फायदा घेत कोच पवन नेहमी तिला आणि तिच्या कुटुंबाला ती मोठी रेसलर बनण्याची स्वप्ने दाखवायचा. इतकेच नाही तर पवनने निशाचे ब्रेनवॉश केले होते आणि तो तिच्याकडून नेहमी पैसेही मागायचा, असे मयत निशाचे वडील दयानंद यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी जवळपास 3.5 लाख रुपये पवनला दिल्याचा दावाही केला आहे. शिवाय निशाने युनिव्हर्सिटी स्तरावर एक मेडल जिंकले होते आणि याच्या पुरस्काराची रक्कमही तिने पवनला दिली होती.

घटनेनंतर आरोपी पवन फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर आरोपी कोट पवन हा सचिन नामक व्यक्तीसोबत बाईकवरुन फरार झाला आहे. पवनची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो या गावात 5 वर्षांपासून राहत होता, तर गेली चार वर्षे कुस्ती शिकवत होता. पवनची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे इनाम पोलिसांनी घोषित केले आहे. तसेच कोच पवन आणि त्याच्या पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुशील कुमारच्या हस्ते अॅकॅडमीचे उद्घाटन

आरोपी पवन हा हलालपूर गावचा रहिवासी नव्हता. या गावातून केवळ निशाच रेसलिंगचे प्रशिक्षण घेण्यास जात होती. निशाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पवनचा त्यांच्या कुटुंबातील मुलीशीच विवाह झाला होता. पवन ज्या जमिनीवर त्याची रेसलिंग अॅकॅडमी चालवत होता ती जमिनवर त्याने अतिक्रमण करुन बनवली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (Women wrestler nisha and her brother murederd by academy’s coach pavan)

इतर बातम्या

बनावट कागदपत्रांवर बारा कोटींचे कर्ज, लातूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होणार!

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटची माहिती गुलदस्त्यातच

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल