AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटची माहिती गुलदस्त्यातच

प्रत्येक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे. जेणेकरून अंमली पदार्थाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सामान्य मुंबईकर सुद्धा आपले योगदान देईल, या आशयाचे पत्र अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांस पाठविले आहे. 

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटची माहिती गुलदस्त्यातच
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विल्हेवाटची माहिती गुलदस्त्यातच
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 4:22 PM
Share

मुंबई : प्रत्येक वर्षी अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे जप्त मुद्देमालाचे अखेर काय केले जाते आणि याची विल्हेवाट लावली जाते की नाही? हा प्रश्न उपस्थित होत असतो. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मागील 3 वर्षात 3414 किलो मुद्देमाल जप्त केला असून यांपैकी 2021 साली जप्त केलेल्या 2593 किलो पैकी फक्त 248 किलो गांजा, एमडी आणि कोडेन याची विल्हेवाट लावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्त्यांनी दिली असून अन्य मालाची माहिती गुलदस्त्यात आहे.

गेल्या 3 वर्षात एकूण किती माल जप्त केला?

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील 3 वर्षात जप्त केलेला मुद्देमाल आणि विल्हेवाटची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष 2019, वर्ष 2020 आणि वर्ष 2021 या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. वर्ष 2019 मध्ये 25.28 कोटींचा 395 किलो 35 ग्रॅम माल तसेच 1343 स्ट्रीप्स, 7577 बॉटल्स, 1551 डॉट जप्त केला. पण या मालाच्या विल्हेवाट बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.

वर्ष 2020 मध्ये 22.23 कोटींचा 427 किलो 277 ग्रॅम माल तसेच 14 मिली ग्राम, 5191 बॉटल्स, 66000 टॅब जप्त करण्यात आला होता. या मालाची विल्हेवाट लावली की नाही? याचीही माहिती दिली नाही.

तर 2021 च्या 25 ऑक्टोबर पर्यंत 83.18 कोटींचा सर्वाधिक माल जप्त करण्यात आला, ज्यात 2592 किलो 93 ग्रॅम माल तसेच 15830 बॉटल्स, 189 एलएसडी पेपर्सचा समावेश होता. विल्हेवाट लावलेल्या मुद्देमालात गांजा 248 किलो 344 ग्राम, एमडी 0.010 किलो ग्रॅम आणि 368 कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरप बॉटल्स आहे.

मागच्या दोन वर्षांची माहितीच दिली नाही

अनिल गलगली यांच्या मते वर्ष 2019 आणि वर्ष 2020 ची माहिती दिलीच नाही आणि 2021 मध्ये 248 किलो मालाची लावलेल्या विल्हेवाटची माहिती दिली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे पोलीस अधिकारी काय करतात हा प्रश्न नेहमी अनुत्तरीतच असतो. यासाठी प्रत्येक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे. जेणेकरून अंमली पदार्थाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईत सामान्य मुंबईकर सुद्धा आपले योगदान देईल, या आशयाचे पत्र अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांस पाठविले आहे.

चालू वर्षात 83.18 कोटींचा माल जप्त

चालू वर्षात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करीत 83.18 कोटींचा माल जप्त केला आहे. कारवाईत ड्रग्स, कोकेन, हेरॉईन जप्त करण्यात आले. ड्रग्स प्रकरणी अनेक सेलिब्रेटींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ड्रग्स पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक आणि तुरुंगवासही भोगावा लागला. चालू वर्षात एकूण जप्त केलेल्या मालापैकी 248 किलो मालाची विल्हेवाट लावल्याचे आरटीआयमध्ये सांगण्यात आले. (Mumbai Police Anti-Narcotics Cell seizes 3414 kg of material in last 3 years)

इतर बातम्या

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.