5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय

मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना एक छोटी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Maharashtra CM Uddhav Thackeray admitted hospital, doctor suggest minor surgery)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:25 PM

मुंबई: मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना एक छोटी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, ठाकरे कुटुंबीयांच्या निर्णयानंतरच शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले. काल संध्याकाळी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्या कोणत्याही चाचण्या करण्यता आल्या नाहीत. आज त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आजच संध्याकाळी येणार आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर रिपोर्ट तपासतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डाँक्टरांचा एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठकरे हे कुटु़बींयांशी चर्चा करून घेतील अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात HN रिलायंन्स हाॉस्पिटल कोणतेही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

राऊत म्हणाले चिंतेचे कारण नाही

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना मुंबईतल्या रिलायन्सच्या हरकिशनदास हॉस्पिटलात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक उपचार करत आहे. लवकरच ते बरे होतील. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रूजू होतील. फार चिंता करावी असं नाही. मानेचं थोडंफार दुखणं आहे. ते पूर्ण होऊन दोनेक दिवसात येतील, असं राऊत यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी एक आवाहन प्रसिद्ध केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असंही त्यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

‘गरीबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम’, नाना पटोलेंचा घणाघात

रामदास कदमांना विधान परिषदेची उमेदवारी नाहीच, ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं?; नवा उमेदवार कोण?

गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन

(Maharashtra CM Uddhav Thackeray admitted hospital, doctor suggest minor surgery)

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू