AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदमांना विधान परिषदेची उमेदवारी नाहीच, ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं?; नवा उमेदवार कोण?

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलंच भोवलं आहे. रामदास कदम यांचा विधान परिषदेच्या उमेदवारीतून पत्ता कट करण्यात आला आहे. (Shiv Sena dropped Ramdas Kadam as MLC election over his ‘rift’ with minister Anil Parab)

रामदास कदमांना विधान परिषदेची उमेदवारी नाहीच, ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं?; नवा उमेदवार कोण?
Ramdas Kadam
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 6:02 PM
Share

मुंबई: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलंच भोवलं आहे. रामदास कदम यांचा विधान परिषदेच्या उमेदवारीतून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे कदम यांच्या जागी कोण? असा सवाल केला जात आहे.

रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच शिवसेनेतून तरुण नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सहा सदस्य निवृत्त होणार

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य रामदास कदम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि गिरीषचंद्र बच्छराज व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यामुळे शिवसेनेतून केवळ रामदास कदम यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे कदम यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, कदम यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार नसल्याचं शिवसेना सूत्रांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. टीव्ही 9 मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतं होतं. मात्र, या ऑडिओ क्लिपशी आपला संबंध नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं होतं.

निवडणूक न लढण्याची घोषणा

रामदास कदम यांनी 2018मध्ये शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या आधी यापुढे कुठली निवडणुक लढवणार नाही असं जाहीर केलं होतं. मंत्री असतानाच पत्रकार परिषद घेत जाहीरपणे या संदर्भातील खुलासा त्यांनी केला होता. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आणि पद घेणार नाही, असं ते म्हणाले होते याची आठवण योगेश कदम यांनी करुन दिली. माझ्याकडची पद तरुणांना दिली जावीत तसेच निवडणुकीत तरूणांना संधी देण्यात यावी असं रामदास कदम म्हणाले होते. त्यामुळे या संदर्भात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय़ घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं आमदार योगेश कदम यांनी सष्ट केलं होतं. आमच्यासाठी शिवसैनिक हेच महत्वाचे पद आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्याकडे पाहताना रामदास कदम यांचे चिरंजीव म्हणूनच पाहतात, असंही योगेश कदम म्हणाले होते. कदम यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळेही त्यांना तिकीट देण्यात येणार नसल्याचं सांगितलं जातं.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)

मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

संबंधित बातम्या:

MPSC Exam Update: वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून मिळणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

‘फडणवीसांच्या काळात मुनगंटीवारांकडे गेल्यावर हाकलून दिलं होतं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राऊतांचा भाजपवर पलटवार

RIYAZ BHATI: दाऊद ते परमवीर सिंग, वाझेपर्यंत कनेक्शन, कोण आहे रियाझ भाटी?

(Shiv Sena dropped Ramdas Kadam as MLC election over his ‘rift’ with minister Anil Parab)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.