AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RIYAZ BHATI: दाऊद ते परमवीर सिंग, वाझेपर्यंत कनेक्शन, कोण आहे रियाझ भाटी?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गँगस्टर रियाझ भाटीसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (WHO IS RIYAZ BHATI WHOM BJP NCP ACCUSING EACH OTHER)

RIYAZ BHATI: दाऊद ते परमवीर सिंग, वाझेपर्यंत कनेक्शन, कोण आहे रियाझ भाटी?
RIYAZ BHATI
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गँगस्टर रियाझ भाटीसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशीही रियाझचे सबंध असल्याचं समोर येत आहे.

रियाझचा दाऊदच्या टोळीशी संबंध आहे. त्याच्यावर फसवणूक, खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 2015 ते 2020मध्ये बनावट पासपोर्ट बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत देश सोडून पळून जाताना त्याला अटक करण्यात आली होती.

आधी सौदी अरब, नंतर आफ्रिकेत पळून जाणार होता

फेब्रुवारी 2020मध्ये जमानतीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले होते. तो सौदी अरबमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वी 2015मध्ये त्याला एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला 2013मध्ये अटक केली होती. तो फेक पासपोर्ट घेऊन पळून जात होता.

जमीन बळकावल्याचा आरोप

त्याच्यावर 2006मध्ये मालाडमध्ये भूखंड हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने दाऊद टोळीशी हातमिळवणी करून भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळा फायरिंग केल्याप्रकरणी खंडाळ्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

वाझे, सिंग प्रकरणात सहआरोपी

गोरेगावमध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझेंविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात रियाझ सहआरोपी आहे. वाझेच्या सांगण्यावरून तो बार मालकांकडून वसुली करत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

मलिक यांचे आरोप काय?

नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन रियाज भाटी आणि देवेंद्र फडणवीस यांचं कनेक्शन असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. रियाज भाटीला 29 ऑक्टोबर रोजी सहार विमानतळावर बनावट पासपोर्टसह पकडला गेला. त्याच्यावर दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रियाज भाटी कोण आहे हे सर्वांना माहीत होतं. डबल पासपोर्टसह एखादा व्यक्ती पकडला जातो आणि दोन दिवसात तो सुटतो त्यामागे काय खेळ होता? रियाज भाटी तुमच्या सोबत अनेक कार्यक्रमात कसा दिसला? रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलपर्यंत रियाज भाटी कसा जात होता? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत नाही. पण त्यांच्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर स्कॅनिंग केल्याशिवाय कुणाला पास दिला जात नाही. पंतप्रधान मुंबईत आले. तेव्हा त्यांच्यासोबत रियाज भाटीने फोटो काढले. कोणत्याही स्क्रुनिटीशिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला? त्याचे कारण काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केली. रियाज भाटीला आशीर्वाद असल्याशिवाय तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाऊच शकत नाही, असंही मलिक म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

(WHO IS RIYAZ BHATI WHOM BJP NCP ACCUSING EACH OTHER)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.