AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. (Maharashtra minister nawab malik reply to devendra fadnavis)

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल
nawab malik
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 11:05 AM
Share

मुंबई: अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. त्याला जामीन कसा मिळाला? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली. रिजाय भाटी कोण आहे? हा सवाल तुम्हाला आहे. 29 ऑक्टोबर रोजी सहार विमानतळावर बनावट पासपोर्टसह पकडला गेला. त्याच्यावर दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रियाज भाटी कोण आहे हे सर्वांना माहीत होतं. डबल पासपोर्टसह एखादा व्यक्ती पकडला जातो आणि दोन दिवसात तो सुटतो त्यामागे काय खेळ होता? रियाज भाटी तुमच्या सोबत अनेक कार्यक्रमात कसा दिसला? रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलपर्यंत रियाज भाटी कसा जात होता? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत नाही. पण त्यांच्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर स्कॅनिंग केल्याशिवाय कुणाला पास दिला जात नाही. पंतप्रधान मुंबईत आले. तेव्हा त्यांच्यासोबत रियाज भाटीने फोटो काढले. कोणत्याही स्क्रुनिटीशिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला? त्याचे कारण काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केली. रियाज भाटीला आशीर्वाद असल्याशिवाय तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाऊच शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या आशीर्वादाने खंडणी वसुली

तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले. बनावट नोटांचं नेक्सस चालवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वसुली केली. विदेशातून गुंड फोन करायचे आणि पोलीस सेटलमेंट करायचे. हा सर्व खेळ तुमच्या आशीर्वादाने सुरू होता. आज एवढंच सांगतो. यापुढे फडणवीसांचे आणखी काळेधंदे उघड करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

त्या प्रकरणाची चौकशी करा

रियाज भाटी फरार आहे. मुन्ना यादववर गुन्हे आहेत. या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा असं आवाहन आम्ही एजन्सीला करत आहोत. बनावट नोटांचं कनेक्शन पाकिस्तानशी आहे. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला, तिकीट दराची ‘उड्डाणं’, महिन्याभरात दर चारपट वाढले!

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

(Maharashtra minister nawab malik reply to devendra fadnavis)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.