AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?

पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे बिएलए या दहशतवादी संघटनेने एकूण 12 ठिकाणी मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे.

एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?
pakistan bla attackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 01, 2026 | 5:38 PM
Share

BLA Attack On Balochistan : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण येथील बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरासह इतर 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात आतापर्यंत पाकिस्तानात 84 सुरक्षा सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तसा दावा बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सरकारने मात्र बिएलएच्या हल्ल्यात 27 सुरक्षा सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बलुचिस्तानातील या हल्यानंतर अमेरिकेने महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

अमेरिकेने केला हल्ल्याचा निषेध

बलुचिस्तानात झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या इस्लामाबादमधील दूतावासाने एक्स या समाजमाध्यमावर भूमिका प्रतिक्रिया दिली आहे. बलुचिस्तानात झालेल्या या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. तसेच “31 जानेवारी रोजी बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांचा तसेच दहशतवादी कारवायाचा आम्ही निषेध खरतो. या हल्ल्यांची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने घेतली आहे. अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे,” असे अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे.

बलूच लिबरेशन आर्मीने कुठे कुठे हल्ले केले?

मिळालेल्या माहितीनुसार बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले आहेत. या संघटनेने क्वेटामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करून थेट पोलीस ठाणेच पेटवून दिले आहे. सोबतच रॉकेट लॉन्चर्सने हल्ला करून एक पोलीस व्हॅनही उडवून देण्यात आले आहे. या पोलीस व्हॅनमध्ये दोन पोलीस कर्मचारी होते. यासह बलुचिस्तान विद्यापीठाच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्यांवरही रॉकेट लॉन्चर्सने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानी सरकारने बलुच लिबरेशन आर्मीविरोधात मोहीम उघडली असून आतापर्यंत 67 दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.

दरम्यान, या हल्ल्यामुळे पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती आहे. बलुच लिबरेशन आर्मीने एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाकिस्तानने उघडलेल्या या मोहिनेत बिएलएवर आणखी कोणकोणती कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....