Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे पारंपरिक 94 वा नारळी सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोरच धनंजय मुंडेंना मंत्री करा अशी घोषणाबाजी सुरु झाली. फडणीस मिश्कील हसले, व्हिडीओ पाहण्यासारखा...
आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे पारंपरिक 94 वा नारळी सप्ताह उत्साहात पार पडला. श्री संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या धार्मिक सोहळ्याची गुरुवारी कीर्तनाने सांगता झाली. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना संबोधित करताना गहिनीनाथ गडाची अध्यात्मिक परंपरा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून झालेली एन्ट्री. व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोरच धनंजय मुंडेंना मंत्री करा अशी घोषणाबाजी सुरु झाली. यावर दवेंद्र फडणवीस मिश्कील हसले अन् हा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला.
Published on: Apr 09, 2026 05:41 PM
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग

