Maharashtra news Live : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या  

| Updated on: Nov 11, 2021 | 12:49 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra news Live : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या  
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Nov 2021 12:00 AM (IST)

    यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या  

    यवतमाळ- यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या

    वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या

    डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव

    हत्येचे कारण अस्पस्ट, पोलीस घटनास्थळी दाखल

    रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन

  • 10 Nov 2021 11:38 PM (IST)

    सचिन वाझे मोठा खुलासा करण्याची शक्यता

    मुंबई : सचिन वाझे मोठा खुलासा करण्याची शक्यता

    कोर्टात खुलासा करण्याची शक्यता

    सुरुवातीला दिलेल्या पत्राबाबत खुलासा करण्याची शक्यता

    अनिल देशमुख यांच्याविरोधातील पत्राबाबत खुलासा करण्याची शक्यता

    जे पत्र प्रसिद्ध होत आहे ते आपलं नाही

    ईडीने आपल्यावर दबाव टाकून जबाब घेतला आहे

    त्यावेळी आपण एन आय एच्या कोठडीत होतो.

    त्यामुळे प्रचंड तनावाखाली होतो, अस सचिन वाझे यांचं मत असल्याचं सूत्रांच म्हणणं आहे.

    ईडी आता पुन्हा सचिन वाझे याचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे

    सचिन वाझे याचं नुकतंच हार्टच ऑपरेशन झालं आहे

    यानंतर ईडी पुन्हा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याची तब्येत पुन्हा बिघडली आहे

    पुन्हा आपल्याला त्रास होत आहे, अस सचिन वाझे यांचं म्हणणं असल्याचं समजत

    सचिन वाझे याची क्राईम ब्रांचची कोठडी 13 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

    तर येत्या 15 नोव्हेंबर रोजी ईडी कोर्टात सुनावणी आहे

    या सुनावणीच्या वेळी सचिन वाझे याच्या वतीने ईडी कोर्टात ईडीच्या तपासाबाबत निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे.

  • 10 Nov 2021 09:13 PM (IST)

    नागपूर जिल्हा न्यायालयाचे किरीट सोमय्या यांना समन्स, 20 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

    नागपूर - नागपूर जिल्हा न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना नोटीस बजावत समन्स केलं जारी

    टीव्हीवरील चर्चसत्रात सोमय्या यांनी कॉंग्रेसवर वसुलीचे आरोप केल्याचे प्रकरण

    कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय सोमय्या यांच्याविरोधात मानहाणीचा दावा

    जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेत सोमय्या यांना नोटीस बजावत समन्स केला जारी

    20 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

  • 10 Nov 2021 08:03 PM (IST)

    तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट, भाविकांची फसवणूक प्रकरण, एकाला अटक

    उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट व भाविकांची फसवणूक प्रकरण

    एकास पोलिसांनी केली अटक, 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

    23 ऑक्टोबर गुन्हा नोंद , 20 दिवसानंतर पहिली अटक

    तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक

    आरोपी केदार दीपक लसणे यास तुळजापूर पोलिसांनी अटक केली

    या प्रकरणात 4 वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात होता

  • 10 Nov 2021 07:55 PM (IST)

    मालेगाव आगारातील 10 कामगारांना करण्यात आले निलंबित

    नाशिक- मालेगाव आगारातील 10 कामगारांना आज करण्यात आले निलंबित

    संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेऊन या कामगारांना करण्यात आले निलंबित

    निलंबित काळात मालेगाव सोडून न जाता रोज 11 ते 1 वाजेच्या दरम्यान आगारात येऊन हजेरी लावण्याची ठेवण्यात आली अट

  • 10 Nov 2021 06:13 PM (IST)

    डोंबिवलीत चोळेगाव येथील गणेश घाटावर लोकांची एकच गर्दी 

    कल्याण : डोंबिवली छटपूजा कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीत पोलिसांकडून मनाई आदेश

    डोंबिवलीत चोळेगाव येथील गणेश घाटावर उत्तरभारतीय समाजातील लोकांची एकच गर्दी

    सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, तोंडावर मास्कदेखील नाही

    कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन

  • 10 Nov 2021 05:53 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 113 कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    पुण्यातील ०० आणि पुण्याबाहेरील 4 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 113 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज

    - पुण्यात करोनाबाधित ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 4

    -114 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504919

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 701

    - एकूण मृत्यू -9077

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-495141

    - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5054

  • 10 Nov 2021 05:14 PM (IST)

    पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पोपटराव पवार यांचा पारनेर तालुक्यात भव्य रॅली काढून सत्कार

    अहमदनगर : हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पारनेर तालुक्यात भव्य रॅली काढून जागोजागी सत्कार

    पुरस्कार मिळाला तेव्हा आनंद व्यक्त करायला शब्दच नव्हते

    हा सर्वोच्च सन्मान आहे तर देशातील मी पाहिला सरपंच आहे

    जमिनीवर माणसांचा जो सन्मान झाला तो या मातीचा आहे असं मी मानतो

    तीस वर्षातील सामाजिक कामाचं हे यश आहेय

    अशक्य असं काही नाही, ठरवलं तर प्रत्येक गोष्ट शक्य होते

    तीस वर्षे जे गावात काम केलं त्याला लोकांचा सहभाग

    शासकीय यंत्रणेचा मार्गदर्शन याचं योग्य नियोजन केलं तर प्रत्येक गाव हिवरेबाजारपेक्षा सुंदर होऊ शकते

    पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया

  • 10 Nov 2021 05:06 PM (IST)

    खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांची भेट 

    सातारा  - खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांची भेट

    शिवेद्रसिंहराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी येऊन घेतली भेट

    अनेक वर्षांनंतर या दोघांमध्ये झाली भेट

    जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडीनंतर एकमेकांना दिल्या शुभेच्छा

  • 10 Nov 2021 04:37 PM (IST)

    राज्याचे हीत धोक्यात येत असेल तर मला वाटतं एसटी कामगारांनी विचार केला पाहिजे- संजय राऊत

    कोणी कोणावर दगड मारायचा हे समजून वागलं तर बरं होईल. आम्ही नेहमी कामगारांच्या बाजूने राहिलेले आहोत. राज्य आणि राष्ट्राचे हीत पाहिले पाहिजे. संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत असेल तर मला वाटतं कामगारांनी विचार केला पाहिजे. सरकारला नाईलाजाने काही पावलं उचलावे लागतात, तसे होऊ नये या मताचा मी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 10 Nov 2021 04:33 PM (IST)

    पाकिस्तान,चीनला बाजूला ठेवून नवी आघाडी होत असेल तर देशासाठी चांगले संकेत- राऊत

    आपल्या देशाच्या सीमावर शांतता राखण्यासाठी हिंदुस्तानचं सरकार पुढाकार घेत असेल तर स्वागत करायला पाहिजे. पाकिस्तान आणि चीनला बाजूला ठेवून नवी आघाडी होत असेल तर मला वाटतं की देशासाठी हे चांगले संकेत आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले

  • 10 Nov 2021 04:31 PM (IST)

    राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास दाखवला पाहीजे- संजय राऊत

    राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास दाखवला पाहीजे

    तोट्यात असले तरी एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहेत

    संजय राऊत

  • 10 Nov 2021 04:22 PM (IST)

    भाजपचे माजी आमदार आदिवासी नेते राजू तोडसाम यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    यवतमाळ : भाजपचे माजी आमदार आदिवासी नेते राजू तोडसाम यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार प्रवेश

    उद्या सकाळी पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजता होणार प्रवेश

    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदार संघात राजू तोडसाम यांची मोठी पकड

    भाजपकडून झाले होते आमदार मात्र अनेक विषयाने वादग्रस्त राहिल्याने त्याना पक्षाने तिकीट नाकारले होते

    संदीप धुर्वे यांना तिकीट दिले होते त्यावेळी अपक्ष निवडणूक लढून चांगली मते घेतली होती

    राष्ट्रवादी ने तोडसाम यांना पक्षात घेऊन राखीव मतदार संघावर दावा करणार अशी माहिती

  • 10 Nov 2021 04:15 PM (IST)

    कॅबिनेट बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात

    मुंबई : विजय वडेट्टीवार, अनिल परब सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित

    कॅबिनेट बैठक थोड्याच वेळात सुरू

  • 10 Nov 2021 04:12 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा खंबीर पाठिंबा : चंद्रकांत पाटील

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भारतीय जनता पक्षाचा खंबीर पाठिंबा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सरकारला ठिकाणावर ठेवण्याचं काम विरोधकांचं आहे आणि आम्ही ते करत आहोत, असेही पाटील म्हणाले.

  • 10 Nov 2021 04:06 PM (IST)

    नवाब मलिकांविरोधात मंत्रालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

    नवाब मलिक यांच्या विरोधात मंत्रालय परिसरात भातीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु आहे.

  • 10 Nov 2021 03:55 PM (IST)

    इंदापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान करुन अनोखं आंदोलन

    इंदापूर मध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांकडून रक्तदान शासन आतापर्यंत आमचं रक्त पित आलं आहे, मात्र आमच्या शरीरातील रक्ताच्या अखेरचा थेंबापर्यंत आम्ही समाजाच्या मदतीलाच येऊ, असे म्हणत आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.. अनेक वाहक, चालक आणि कर्मचारी रक्तदान शिबिरात सहभागी झाले आहेत.

  • 10 Nov 2021 02:50 PM (IST)

    उद्धवसाहेब, हजारो एस टी कर्मचारी आझाद मैदानावर बसलेत, तुमचा मंत्री कुठंय? : दरेकर

    आमचं सरकार असताना कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ कधीच येऊ दिली नाही उद्धवसाहेब तुम्ही म्हणाला होतात, आंदोलकांना मंत्र्याला भेटायला यावं लागणार नाही, आमचा मंत्री आंदोलनकर्त्यांना भेटेल उद्धवसाहेब, आता मला विचारायचंय, कुठाय तुमचा मंत्री, कुठंय अनिल परब? पोटापाण्याची काळजी करु नका तुमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ मुंबई अख्ख्या देशाची काळजी घेते उद्यापासून तुमच्या समर्थनार्थ आमदार खासदारांची फौज उतरेन तुम्हाला तुरुंगात टाकायला सरकारने पाऊल उचललं तर तुमच्याआधी आम्ही तुरुंगात जाऊ

  • 10 Nov 2021 02:30 PM (IST)

    विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर एस टी कंडक्टरचा मुलगा म्हणून आलोय : प्रवीण दरेकर

    हे सरकार बहिरं झालंय, पण आमचा आवाज तुमच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही : दरेकर

    विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर एस टी कंडक्टरचा मुलगा म्हणून आलोय मला एसटी कामगारांच्या व्यथा, त्यांचं दु:ख माहितीय, आज नेता म्हणून या आंदोलनाला आलेलो नाहीय जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही किरीटभाई, आपल्यामुळे अनिल परब पळाले तर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय कोण देणार? संकटात हाच एसटी कर्मचारी तुम्हाला मदत करतो मात्र विलिनीकरण म्हणताच अवमान याचिका दाखल करता, परबसाहेब हे काही बरोबर नाही हे सरकार बहिरं झालंय, पण आमचा आवाज तुमच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, दरेकरांची राज्य सरकारवर टीका मंत्रालयात बसलेल्या लोकांना अजूनपर्यंत जाग येत नाही न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसू नका, भाजप तुमच्यासोबत कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार, कारण माझा बाप एसटी कंडक्टर परबांना हारतुरे घालू, मुख्यमंत्र्यांच्या पाया पडू, पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

  • 10 Nov 2021 02:20 PM (IST)

    तुम्हाला खायला पैसे आहेत, एस टी कामगारांना द्यायला नाहीत काय? पडळकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

    एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ अनेक एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या पण सरकारला पाझर फुटत नाही मतांच्या वेळी मराठीचं राजकारण करता आता आंदोलन करणारे मराठी नाहीत का अनिल परब म्हणतात, भाजपवाले डोकी भडकवतायत पण तुम्हीच सांगा आम्ही डोकी भडकवतोय का? तुम्हाला खायला पैसे आहेत, एस टी कामगारांना द्यायला नाहीत काय? पडळकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र काहीही मागणी केली की महामंडळ तोट्यात आहे, अरे तुमच्या खाण्याने महामंडळ फायद्यात येईल कसं? जर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सरकारभोवती फास आवल्याशिवाय एस टी कर्मचारी शांत बसणार नाहीत परिवहन मंत्री म्हणतात, दिवाळी गोड केली मग मला त्यांना विचारायचंय, दिवाळी गोड झाली तर एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या का केली? भाजप पक्ष ताकदीने आपल्या पाठीमागे उभा आहे.

  • 10 Nov 2021 02:14 PM (IST)

    सोमय्या, पडळकर, सदाभाऊ खोत यांनाही आझाद मैदानात आणलं

    सोमय्या, पडळकर , सदाभाऊ खोत यांनाही आझाद मैदानात आणलं सरकारला झुकावं लागेल एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील सरकारपुढे दुसरा कोणताही मार्ग नाही- किरीट सोमय्या एक अनिल आतमध्ये गेलाय, आता दुसऱ्या अनिलचा नंबर, सोमय्यांचा इशारा, फटके आणि टोले

  • 10 Nov 2021 01:02 PM (IST)

    ST Bus Strike In Maharashtra : पडळकर, सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    पडळकर, सोमय्या मोर्चासाठी रवाना एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी मंत्रालयाबाहेर प्रचंड मोठा पोलिसांचा फौजफाटा पडळकर, सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मरीन ड्राईव्ह पोलिसांनी पडळकर, सोमय्यांना ताब्यात घेतलं

  • 10 Nov 2021 12:30 PM (IST)

    विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही : परिवहन मंत्री अनिल परब

    विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिलेत महामंडळाची एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका एस टी कामगारांना माझी विनंती, कुणाच्याही भाषणबाजीला बळी पडू नका, नुकसान होऊ देऊ नका

    एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं नाहीतर पगार कापले जातील कामगारांचं यात मोठं नुकसान होईल न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला

    सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत विलिनीकरणासंदर्भात पुढच्या 12 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश असे मुद्दे असतात, की जे एक दोन दिवसांत मार्गी लागत नाही अशा मोठ्या निर्णयांना वेळ लागतो, आपण चर्चेतून मार्ग काढू

  • 10 Nov 2021 12:21 PM (IST)

    जेलमध्ये असलेल्या आरोपीशी तुम्ही व्यवहार कसा केला? शेलारांचा सवाल

    जेलमध्ये असलेल्या आरोपीशी तुम्ही व्यवहार कसा केला तुम्ही विशेष परवानगी घेऊन जेलमध्ये गेलात, की विशेष परवानगीने त्याला बाहेर आणलत? मलिकांनी आता उत्तर द्यावं तुमचं मास्टरमाईंड दुसरं कोणी होतं का? तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या विषय भरकटवू नका महाराष्ट्रातील जनतेला याची उत्तरं हवीत

  • 10 Nov 2021 12:08 PM (IST)

    हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगी फोडू शकले नाहीत, आशिष शेलारांचा घणाघाती हल्ला

    मलिकांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला काय?

    आजच्या पत्रकार परिषद नवाब मलिकांची हतबलता दिसून आली हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगी फोडू शकले नाहीत मुन्ना यादव, हाजी हैदर भाजपचे कार्यकर्ते, मलिकांनी सांगितलेलं खरं पण त्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत गुन्हेगारांना राजाश्रय देणं हा तुमचा धंदा, शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

    रियाज भाटीचा उल्लेख मलिकांनी केला पंतप्रधान कार्यालयाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही जर फोटोवरुन संबंध लावायचे असतील तर मग मी तुम्हाला फोटो दाखवतो असं म्हणत शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे यांच्याशी रियाज भाटीशी असलेले फोटो दाखवले

    रियाज भाटी गायब आहे की पळून गेलाय आमचं म्हणणं आहे की सत्य बाहेर येईल म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला पळवून नेला नाही ना? अशी आम्हाला शंका मलिकांची आम्हाला चिंता वाटते, मानसिक संतुलन बिघडलंय, हर्षल तंबाखूचा सप्लाय बंद पडला की काय?

  • 10 Nov 2021 12:03 PM (IST)

    नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू

    नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू

    भारतासह 6 देशांचे सल्लागार उपस्थित

    अफगाणिस्तानमधील नागरिकांना शक्य ती मदत करण्याबाबत चर्चा

    अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार

    पाकिस्तान आणि चीनचे सुरक्षा सल्लागार अनुपस्थित

    भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत बैठक

  • 10 Nov 2021 11:52 AM (IST)

    मी खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट शिकलोय... मलिकांचं नाव न घेता फडणवीसांचा निशाणा

  • 10 Nov 2021 11:50 AM (IST)

    नवाब मलिकांनी आरोप केलेले मुन्ना यादव कोण?

    मुन्ना यादव कोण?

    - भाजपचे २५ वर्षांपासून कार्यकर्ते

    - १० वर्षे भाजपचे नगरसेवक

    - देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातून दोन वेळा नगरसेवक

    - कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष

    - सध्या मुन्ना यादव यांची पत्नी भाजपची नगरसेवीका

    - देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

    - अनेक राजकीय गुन्हे दाखल

  • 10 Nov 2021 10:37 AM (IST)

    Munna Yadav Live : मलिक माझी बदनामी करत आहेत, त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार

    मी देवेंद्रजींचा निकटवर्तीय, माझ्याविरोधात याआधीही खोट्या केसेस आणि चौकशा

    माझ्यावर कोणतेही क्रिमिनल गुन्हे नाहीत माझ्यावर राजकीय गुन्हे आहेत मलिक माझी बदनामी करत आहेत मी मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहेत त्यांची औकात 1 रुपयांची काल म्हणाले, हायड्रोजन बॉम्ब टाकणार, आज हा बॉम्ब फुसका निघाला मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावे नवाब मलिक लवकरच जेलमध्ये जाणार मी देवेंद्रजींचा निकटवर्तीय, माझ्याविरोधात याआधीही खोट्या केसेस आणि चौकशा पण चौकशीतून काहीही निष्पन्न झालेलं नाही, आताही चौकशी लावायची असेल तर लावू शकता, त्यातून काहीही साध्य होणार नाही

  • 10 Nov 2021 10:32 AM (IST)

    Nawab Malik PC : वेळ आली तर तुमची काळी संपत्ती आज ना उद्या काढणार, नवाब मलिक यांचा अमृता फडणवीसांना इशारा

    चोर मचाये शोर यांची काळी संपत्ती काढायची वेळ आली तर ते पण आज ना उद्या काढू वरळीत दोनदोनशे कोटींचे कुणाच्या नावाने प्लॅट वेळ आली तर ते पण काढू मी महिलांबद्दल काही बोलू इच्छित नाही, मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही

  • 10 Nov 2021 10:31 AM (IST)

  • 10 Nov 2021 10:26 AM (IST)

    Nawab Malik PC : अंडरवर्ल्डशी संबंध असलेला रियाज भाटी कोण?, तो पंतप्रधानांपाशी पोहोचला कसा?

    रियाज भाटी कोण आहे? बनावट पासपोर्ट मिळूनही तो 2 दिवसांत कसा सुटला त्याला कुणाचा आशीर्वाद आहे रियाज भाटीचे फडणवीसांसोबत फोटो मलिकांचे फडणवीसांना सवाल रियाज भाटीच्या माध्यमातून किती पैसे उकळले

  • 10 Nov 2021 10:13 AM (IST)

    Nawab Malik PC : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, मलिकांचा गंभीर आरोप

    ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले, दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटबंदी करण्यात येत आहे. नोटबंदी नंतर संपूर्ण देशात २००० आणि ५०० च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या तामिळनाडू, पंजाबत कारवाई होत होती मात्र ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोटा पकडण्यात आल्या नाही. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. ८ ऑक्टोबर २०१७ १४ कोटी ५६ बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे.

    मुंबईत या प्रकरणी एक अटक झाली. इम्रान आलम शेख. पुण्यात रियाज शेखला अटक केली. नवी मुंबईत एकाला अटक केली. मात्र १४ कोटीच्या जप्तीला ८ लाख ८० हजार दाखवून प्रकरण दाबलं गेलं. पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालू राहव्यात, गुन्हे दाखल होवो काही दिवसात जमानत होते. प्रकरण एनआयएला दिलं नाही. यात कोण आहे ते सांगितलं जात नाही. कारण बनावट नोटांना तात्कालीन सरकारचं अभय राहिलं. काँग्रेसचा नेता होता म्हणून सांगितलं पण काँग्रेस नेता नव्हता. काही झालं तर काँग्रेसवर बील फाडण्याचं काम केलं.

    इमरान शेख हा हाजी अरफात शेखचा छोटा भाऊ आहे. हाजीर अरफात शेखला भाजपात घेऊन अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष केला. मुन्ना यादवला चेअरमन केलं. बांगलादेशीना आणणाऱ्यांना मौलाना आझाद महामंडळाचा अध्यक्ष करता?

  • 10 Nov 2021 10:08 AM (IST)

    Nawab Malik PC : फडणवीसांचं कनेक्शन कुठे कुठे? मलिकांनी 3 उदाहरणं सांगितली

    फडणवीसांनी माझ्यावर काही आरोप लावले. त्याचा कालच मी खुलासा केला. तुम्ही मंत्री असताना सलिम पटेल बाबत माहिती नव्हती का. २००५मध्ये मी मंत्री नव्हतो आर आर पाटीलसोबतचा तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला. मी संपत्ती घेतल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला पाच महिन्यांपूर्वी सलिम पटेलचा मृत्यू झाला.

    एनसीबीच्या खंडणीप्रकरणावरून फडणवीस लक्ष विचलीत करत आहेत. जे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्व लोकांना सरकारी कमिशन, सरकारी बोर्डाचा अध्यक्ष का केलं?

    मुन्ना यादव नागपूरचा कुविख्यात गुंड, त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे, तो तुमचा साथी आहे. त्या मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवलं होतं की नाही. तुमच्या गंगेत अंघोळ करून मुन्ना यादव पवित्रं झाला का?

    हैदर आजम बांगलादेशींना साथ देतो. त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. मालाड पोलीस त्याची चौकशी करत आहे. बंगाल पोलिसांनी कागदपत्रं खोटे आहेत असं सांगितलं. तुमच्या कार्यालयातून पोलिसांना फोन गेला. ते प्रकरण दाबलं की नाही? तुमच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात वसुली होत होती की नाही बिल्डरांकडून वसुली केली जात होती की नाही?

  • 10 Nov 2021 10:05 AM (IST)

    Nawab Malik PC : फडणवीसांकडून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न, माझ्यावरच्या आरोपांना मी कालच प्रत्युत्तर दिलंय

    फडणवीसांकडून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न

    फडणवीस आणि एनसीबी अधिकाऱ्यांचे चांगले संबंध

    फडणवीसांचे माझ्यावर वैयक्तिक आरोप पण मी कालच त्यांच्या आरोपांवर खुलासे केलेत

  • 10 Nov 2021 09:54 AM (IST)

    शिवाजीनगर बस स्थानकावरून एसटी महामंडळाकडून खाजगी बसेसची व्यवस्था

    - शिवाजीनगर बस स्थानकावरून एसटी महामंडळाकडून खाजगी बसेसची व्यवस्था

    - बसच्या तिकीट दरात खाजगी बस सुरू,

    - नाशिक , औरंगाबाद आणि बीड कडे जाणाऱ्या खाजगी बसेस सुरू,

    - आरटीओच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बसेस सोडण्यात येत आहेत.

  • 10 Nov 2021 09:47 AM (IST)

    सलग चौथ्या औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

    सलग चौथ्या औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

    एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन सुरू

    सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करून आंदोलन सुरू

    एसटी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी सुरू

  • 10 Nov 2021 09:39 AM (IST)

    सरकारचा काळा चेहरा समोर आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    एसटी कर्मचाऱ्याची इतकी वर्ष फरवणूक केली आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल सरकार कडून अंदोलन दाबण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    सरकारचा काळा चेहरा समोर

  • 10 Nov 2021 09:31 AM (IST)

    औरंगाबाद शहरात वाहनधारकांना कोरोना लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही

    औरंगाबाद शहरात वाहन धारकांना लस घेतली नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. हा आदेश पेट्रोल पंप चालकांना प्राप्त होताच आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

  • 10 Nov 2021 09:30 AM (IST)

    अहमदनगर जिल्हात रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक

    अहमदनगर जिल्हात रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक

    कोणत्याही क्षणी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुनील पोखरणा आणि डॉ.सुरेश ढाकणे वैद्यकीय अधिकारी यांना होऊ शकते अटक

    पोलिसांकडून घटनेची कसून चौकशी सुरू, पुरावा मिळताच उर्वरित दोन अधिकाऱ्यांना होऊ शकते अटक

  • 10 Nov 2021 08:41 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांना मानखुर्दला अडवलं, सदाभाऊ खोत संतापले

    एसटी कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा

    त्याअगोदर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना अडवलं

    हे राज्य हुकुमशाही पद्धतीन चाललंय

    परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांवर अन्याय करतायत

    तुम्ही मंत्रालयात गांजा ओढत बसलाय, हिम्मत असेल तर कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करा

    सदाभाऊ खोत यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खोचक टीका

  • 10 Nov 2021 08:25 AM (IST)

    अजित डोवालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची महत्त्वपूर्ण बैठक

    राजधानी नवी दिल्लीमध्ये आज दुपारी 12 वाजता अफगाणिस्तान बाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत पाकिस्तान आणि चीन मात्र सहभागी होणार नाहीय. मात्र इराण, कजाकिस्तान ,ताजिकिस्तान , तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तान या देशांमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी होणार आहेत. पण आजच्या भारतात होणाऱ्या या बैठकीकडे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांचे लक्ष असणार आहे.

  • 10 Nov 2021 08:07 AM (IST)

    उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, नवाब मलिकांनी फडणवीसांना डिवचलं

  • 10 Nov 2021 07:48 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेला 651 कोटी रुपये थकीत मालमत्ताकर वसूलीत अपयश

    -नागपूर महानगरपालिकेला ६५१ कोटी रुपये थकीत मालमत्ताकर वसूलीत अपयश

    - ३.८६ लाख मालमत्ताधारकांकडील थकबाकी वसुलीसाठी मनपा आक्रमक

    - चालू मालमत्ताकराच्या १०० टक्के वसूलीचे मनपाचे प्रयत्न

    - मनपा आयुक्तांकडून दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्तांना दररोज १.४८ कोटींच्या वसूलीचं टार्गेट

    - महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याचे प्रयत्न

  • 10 Nov 2021 07:34 AM (IST)

    सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला

    सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला.

    चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले असतानाचं तिकीट दर वाढले.

    महिन्याभरातच तिकिटाचे दर झाले 12 हजार रुपये

    चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीट अडीच हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

    सिंधुदुर्गतील चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढल्यामुळे आश्चर्य.

  • 10 Nov 2021 07:15 AM (IST)

    शाळांना 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी, सुट्टीबाबत गोंधळ सुरूच

    शाळांना 20 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी

    सुट्टी बाबत गोंधळ सुरूच

    22 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार

    प्राथमिक विभागाच्या शाळांबाबत अद्याप निर्णय नाही

    माध्यमिक विभागाने प्राथमिक विभागाशी समनव्य न ठेवता निर्णय घेतल्याने गोंधळ

    सुट्ट्यांच्या नियोजनातील गोंधळामुळे विद्यार्थी,पालक,शिक्षक यांचा गोंधळ

  • 10 Nov 2021 07:14 AM (IST)

    पुण्यात हेल्मेटसक्ती नाही मात्र विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या पुणेकरांकडून दंड वसूल

    पुण्यात हेल्मेटसक्ती नाही मात्र विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या पुणेकरांकडून दंड वसूल,

    1 जानेवारी ते 8 नोव्हेंबर दरम्यान तब्बल 16 लाख 16 हजार 170 जणांवर केली कारवाई,

    कारवाईत एकुण 80 कोटी 80 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल,

    वाहतूक नियामांच उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई,

    विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन फाडली जाते दंडाची पावती ..

    गेल्या 11 महिन्यात 16 लाख पुणेकरांवर विनाहेल्मेटची कारवाई

  • 10 Nov 2021 07:14 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक, कोणत्या पक्षाकडून कुणाचं नाव चर्चेत?

    स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक

    - भाजपचा ओबीसी चेहरा चंद्रशेखर बावनकुळे, विक्की कुकरेजा यांची नावं आघाडीवर

    - काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचं नाव आघाडीवर

    - महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप बावनकुळेंना संधी देऊन ओबीसींची नाराजी दूर करणार?

    - माजी पालकमंत्री असल्याने मतदारांची बावनकुळे यांच्या नावाला पहिली पसंती

    - मतांच्या आकडेवारीत सध्या भाजपचं पारडं जड

    - मंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची भुमिका महत्त्वाची

  • 10 Nov 2021 06:59 AM (IST)

    व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, 30 नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

    व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख
    ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार

    व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार हे नवे नौदल प्रमुख

    केंद्र सरकारनं त्यांच्या नावाला मंजुरी

    सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ

    ३० नोव्हेंबर रोजी नौदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार.

    संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील दिली माहिती

  • 10 Nov 2021 06:53 AM (IST)

    कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर एसटीचा संप सुरुच

    राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू असून सरकारने संप करणाऱ्या राज्यातील 45 डेपोतील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतरही एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर एसटी आगारातील एसटी कर्मचारी मध्यरात्री नंतर ही कडाक्याच्या थंडीत आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची चिंता न करता आंदोलन स्थळीच झोपून आंदोलन करत आहेत.

  • 10 Nov 2021 06:52 AM (IST)

    कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार

    कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेचा दोन विशेष गाड्या धावणार

    यात्रेच्या काळातील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय

    आदिलाबाद- पंढरपूर , नांदेड -पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस विशेष गाडी धावणार

    जा प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच गाडीत प्रवेश मिळणार

    14 नोव्हेंबर रोजी ही गाडी आदीलाबाद स्थानकावरून सुटणार

    15 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता पंढरपूर स्थानकावर पोचणार

  • 10 Nov 2021 06:51 AM (IST)

    सोलापूर विधान परिषद निवडणूक : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी

    सोलापूर विधान परिषद निवडणुकीत बाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी

    जिल्हा नियोजन समितीचे अजित जगताप सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक यांना सोबत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

    स्थानिक संस्था मतदारसंख्या ही 75 टक्के पेक्षा जास्त कार्यरत असताना ही अपुर्‍या माहितीच्या आधारे अपेक्षित संख्यान असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप

  • 10 Nov 2021 06:50 AM (IST)

    नवाब मलिकांची 10 वाजता पत्रकार परिषद

    1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज सकाळी 10  वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहे.

Published On - Nov 10,2021 6:45 AM

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.