बनावट कागदपत्रांवर बारा कोटींचे कर्ज, लातूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होणार!

बनावट कागदपत्रांवर बारा कोटींचे कर्ज, लातूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होणार!
प्रातिनिधिक छायाचित्र

संपत्तीचे मालक गिल्डा यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम पोलिसांकडे आणि नंतर न्यायालयात झाव घेतली. सदर प्करणी न्यायाधीश भोसले यांनी राजलक्ष्मी भोसले यांनी राजलक्ष्मी पेट्रोकेम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 11, 2021 | 6:04 PM

लातूरः बनावट कागदपत्रे तयार करून लातुरातील उद्योजकाची मालमत्ता एका कंपनीने तारण ठेवल्याचे प्रकरण लातूरमध्ये उजेडात आले आहे. यातून तब्बल 12 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर कंपनीविगुन्हा दाखल करण्याचेरुद्ध  आदेश न्यायाधीश यू.ए. भोसले यांनी दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

याविषयी अॅड निलेश जाजू, अॅड. व्यंकट नाईकवाडे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक विनोदकुमार रामगोपालजी गिल्डा यांनी उद्योगभवन परिसरात प्लॉट घेतला होता. 2004 मध्ये राजलक्ष्मी पेट्रोकेम प्रा. लि. या कंपनीसाठी औद्योगिक वसाहतीचे ना हरकत घेऊन लघु उद्योग बँक, मुंबई यांच्याकडे तो प्लॉट तारण दिला होत. 2014 मध्ये कर्ज परतफेड झाल्यानंतर लघुउद्योग बँकेने परत केलेली कागदपतत्रे परस्पर मिळवून लातूरमधीलच उद्योजकाने राजलक्ष्मी पेट्रोकेम प्रा. लि. कंपनीसाठी जनता सहकारी बँक, पुणे यांच्याकडून बारा कोटींच्या कर्जासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ज्यावेळी यांना अन्य व्यवहारासाठी प्लॉटची मूळ कागदपत्रे हवी होती, त्यावेळी उपरोक्त कंपनीच्या उद्योजकाने ती देण्यास टाळाटाळ केली. शेवटी गिल्डा यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम पोलिसांकडे आणि नंतर न्यायालयात झाव घेतली. सदर प्करणी न्यायाधीश भोसले यांनी राजलक्ष्मी भोसले यांनी राजलक्ष्मी पेट्रोकेम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हा दाखल होऊन चौकशी होणार

लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार, गुन्हा दाखल करून याप्रकरणाची रितसर चौकशी केली जाईल.

इतर बातम्या-

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें