औरंगाबादः 8 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचे गूढ उकलले, पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली हत्या!

औरंगाबादः 8 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचे गूढ उकलले, पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली हत्या!
प्रातिनिधिक छायाचित्र

सोमवारी दुपारी गोलटगाव येथील घरात दगडू पाचे यांच्या घरात त्यांच्या 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मुलीने गळफास घेतल्याचे भासवण्यात आले होते. मात्र करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 11, 2021 | 11:06 AM

औरंगाबादः करमाडमधील (Karmad Aurangabad) गोलटगाव येथे दोन दिवसांपूर्वी दुसऱ्या इयत्तेतच्या मुलीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली होती. या मुलीने आत्महत्या (Suspicious suicide) केल्याचे भासवण्यात आले होते. त्यामुळे 8 वर्षांच्या या मुलीचा अशा प्रकारे खून कोणी केला, याचा तपास पोलीस (Police investigation) करत होते. या प्रकरणी बापानेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर गुन्ह्याची कबुली बापाने दिल्यावर करमाड पोलिसांनी त्याला गजाआड केले.

सोमवारी दुपारी आढळला मृतदेह

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाडमधील गोलटगाव येथील या घटनेने करमाडमध्ये खळबळ माजली होती. सोमवारी दुपारी गोलटगाव येथील घरात दगडू पाचे यांच्या घरात त्यांच्या 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मुलीने गळफास घेतल्याचे भासवण्यात आले होते. मात्र करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे बापानेच हे कृत्य केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता.

पती-पत्नीतील वादामुळे मुलीला जीवघेणी शिक्षा

सदर प्रकरणी, मुलीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळफासाने खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पती-पत्नीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या वेळी दगडू पाचे याच्या घरात सदर 8 वर्षीय मुलगी, तिची बहीण, आजी आणि बाप होता. पत्नी माहेरी गेलेली होती. पती-पत्नीदरम्यान वाद असल्याने ती नांदायला येत नव्हती. म्हणून दगडू पाचे यानेच आपल्या मुलीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. या गुन्ह्याची कबुली त्याने करमाड पोलिसांना दिली. आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या या क्रूर बापाला करमाड पोलिसांनी गजाआड केले आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

Fraud: सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले, सेवानिवृत्त अधीक्षकांचा आरोप, तिघांवर गुन्हा दाखल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें