AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी औरंगाबादमधील भाजपचे संजय केणेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपने निश्चित केले आहे. त्यानुसार केणेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान
भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकरांची विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 10:11 AM
Share

औरंगाबादः काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 29 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये पोटनिवडणूक (By-election) होत आहे. या जागेसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार कोणता असेल, याची स्पष्टोक्ती केली नसली तरीही भाजपने औरंगाबादचे शहराध्यक्ष तसेच माजी उपमहापौर संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांची या निवडणुकीसाठीची उमेदवारी निश्चित केली आहे.

15 नोव्हेंबर रोजी केणेकर अर्ज दाखल करणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून केणेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपने निश्चित केले आहे. त्यानुसार केणेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केणेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाी अर्ज भरण्याची मुदत 16 नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून त्यांचे नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर रोजी केणेकर यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

भविष्यातील राजकीय स्थितीचे आडाखे कळतील

महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. मात्र औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळातील लोकांना पडला आहे. मात्र सदर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीवरून शहरातील शिवसेना आणि भाजपच्या आगामी राजकारणाची समीकरणे स्पष्ट होतील, असे म्हटले जात आहे. दरम्यान, संजय केणेकर यांनी म्हटले की, प्रदेशाध्यक्षांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यापलिकडे मला माहिती नाही. भाजपने जुलै महिन्यात डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले. तसेच आमदार अतुल सावे यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारीणीवर जबाबदारी दिली. असे असतानाच शहराध्यक्ष केणेकर यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देत येथील कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचे काम पक्षातर्फे होत असून यामागे आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे राजकारण आहे, असे बोलले जात आहे.

जुलै 2024 पर्यंत आमदारकीचा कार्यकाळ

सदर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विधानसभेचे सदस्य गुप्त पद्धतीने मतदान करतील. त्यानंतर निवडून येणाऱ्या या आमदाराचा कार्यकाळ जुलै 2024 पर्यंत असेल. भाजपचे 106 तर महाविकास आघाडीचे 170 संख्याबळ आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यासाठीचे अर्ज देण्याची मुदत 16 नोव्हेंबरपर्यंत आहे. तसेच 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

इतर बातम्या-

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध

“1990 मध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजात फूट पडली, जिथे गेले तिथे द्वेषाची बीजे पेरली”- दिग्विजय सिंहांचा घणाघात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.