मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल, मान आणि मणक्याच्या आजाराबाबत शस्त्रक्रियेची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल, मान आणि मणक्याच्या आजाराबाबत शस्त्रक्रियेची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातील 19 व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्र्यांवर कोणतीही वैद्यकीय चाचणी केली जाणार नाही आहे. उद्या सकाळी त्यांची वरिष्ठ आर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

हेमंत बिर्जे

| Edited By: सागर जोशी

Nov 10, 2021 | 10:40 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याच्या त्रास जाणवत आहे. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास प्रकर्षाने सुरु झाल्याचं कळंतय. त्या पार्श्वभूमीवर ते आज गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातील 19 व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्र्यांवर कोणतीही वैद्यकीय चाचणी केली जाणार नाही आहे. उद्या सकाळी त्यांची वरिष्ठ आर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. (CM Uddhav Thackeray has been admitted to HN Reliance Hospital in Girgaon for treatment)

मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या विशेष कक्षात तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आहेत. तर कक्षाबाहेर मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सुरक्षा रक्षक तैनात आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या रुग्णालयात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार असल्याचीही माहिती मिळतेय.

मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

उद्धव ठाकरेंचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करु नका, असं आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

इतर बातम्या :

नवाब मलिकांच्या फडणवीसांवरील आरोपाला समीर वानखेडेंचं उत्तर, ‘जप्त केलेल्या बनावट नोटा 14 कोटीच्या नाही तर 10 लाखाच्या’

एसटी कर्मचारी आंदोलनावरुन संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर गंभीर आरोप, आता मुनगंटीवारांचंही प्रत्युत्त

CM Uddhav Thackeray has been admitted to HN Reliance Hospital in Girgaon for treatment

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें