नवाब मलिकांच्या फडणवीसांवरील आरोपाला समीर वानखेडेंचं उत्तर, ‘जप्त केलेल्या बनावट नोटा 14 कोटीच्या नाही तर 10 लाखाच्या’

नवाब मलिकांच्या बनावट नोटांबाबतच्या आरोपाला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जप्त केलेल्या बनावट नोटा 14 कोटीच्या नाही तर 10 लाख रुपयांच्या होत्या, असं वानखेडे यांनी सांगितलं आहे.

नवाब मलिकांच्या फडणवीसांवरील आरोपाला समीर वानखेडेंचं उत्तर, 'जप्त केलेल्या बनावट नोटा 14 कोटीच्या नाही तर 10 लाखाच्या'
नवाब मलिक, समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 10:07 PM

मुंबई : चार वर्षांपूर्वी 14 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण दाबलं गेलं. त्यावेळीही समीर दाऊद वानखेडेच अधिकारी होते. हा योगायोग होता काय? असा सूचक सवाल करतानाच देवेंद्र फडणवीसांनीच हे प्रकरण दाबण्यासाठी मदत केली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या या आरोपाला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जप्त केलेल्या बनावट नोटा 14 कोटीच्या नाही तर 10 लाख रुपयांच्या होत्या, असं वानखेडे यांनी सांगितलं आहे. (Sameer Wankhede responds to allegations made by Nawab Malik against Devendra Fadnavis)

नवाब मलिक यांनी आरोप केला आहे की, ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील बीकेसीमध्ये DRI ने छापा टाकून 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तेव्हा समीर वानखेडे यांच्याकडे हे प्रकरण होतं. हे प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी समीर वानखेडे यांची मदत केली होती. हाजी अराफात शेखच्या भावाचं प्रकरण दाबलं. 14 कोटीची रक्कम 8 लाख 80 हजार सांगितली गेली. काही दिवसांतच आरोपीला जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवलं जाणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही. नवाब मलिक यांनी सांगितलं की आरोपीचे भाऊ हाजी अराफात शेखला पक्षांतर करायला लावून मायनॉरिटी कमिशनचा अध्यक्ष केलं. दरम्यान, या आरोपाचं समीर वानखेडे यांनी खंडन केलं आहे.

मलिकांचा आरोप चुकीचा – वानखेडे

समीर वानखेडे यांनी सांगितलं की, DRI ने बनावट नोटा जप्त केल्या होत्या त्या 14 कोटी 56 लाखाच्या नव्हत्या. तर 10 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी तीन लोकांना अटक केली होती. DRI ने या प्रकरणात एनआयएलाही संपर्क केला होता. एनआयएने हे प्रकरण घेतलं नाही. दरम्यान, मलिक यांनी आरोप केला होता की, फडणवीसांच्या काळात त्यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा धंदा वाढीस लागला होता.

फडणवीसांचं ट्विटद्वारे मलिकांना उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी नोबल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

इतर बातम्या : 

एसटी कर्मचारी आंदोलनावरुन संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर गंभीर आरोप, आता मुनगंटीवारांचंही प्रत्युत्तर

गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन

Sameer Wankhede responds to allegations made by Nawab Malik against Devendra Fadnavis

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.