पालखी मार्गाच्या कार्यात महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे.

पालखी मार्गाच्या कार्यात महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 4:37 PM

पंढरपूरः पालखी मार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला.

मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य

ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहून देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत राहू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलंय.

डोळ्यामध्येच मावत नाही, तर कॅमेऱ्याचं सोडाच

या वारीचं दर्शन मी स्वतः घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी वारीची फोटोग्राफी मी हेलिकॉप्टरमधून केलेली आहे. ते विराट दर्शन मी त्यावेळी पाहिलं, डोळ्यामध्येच मावत नाही, तर कॅमेऱ्याचं सोडाच. अनेक ठिकाणांहून पालख्या येत असतात, या पालख्या म्हणजे जणू काही नद्या सागराकडे वाहत आहेत, असंच ते दृश्य असतं, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

देहभान हरपून म्हणजे काय याचा प्रत्यय तिकडे येतो

शेवटचं मोठं रिंगण असतं ते वाखरीचं, नितीनजी ही गोष्ट अत्यंत चांगली केलीत. वाखरी ते पंढरपूर हा महामार्गसुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतलात. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सगळ्या नद्या तिकडे येतात आणि तिकडे मोठा भक्तिसागर होतो. भक्तिसागरऐवजी दुसरा शब्द मला तरी सूचत नाही. या पालखीचा थोडा अनुभव मी पायीसुद्धा घेतलेला आहे. आपण वेगळ्या दुनियेत राहतो, पण हा वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेलेला आहे. त्यांच्याबरोबर थोडा चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देहभान हरपून म्हणजे काय याचा प्रत्यय तिकडे येतो. पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

परकीय आक्रमणं झेलून या वारकरी सांप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरू

जोपर्यंत आपण त्याच्यात असतो, आपणही देहभान हरपून जातो. रस्ते तर चांगले असेलच पाहिजे, पण त्या मार्गावरून आपल्या देशानं आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. ही वाटचाल पुढे सहजतेने व्हावी, याच्यासाठी आज आपण पुढाकार घेतला. त्याबद्दल खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत आपल्याला वारकरी संप्रदायानं खूप काही दिलेलं आहे. दिशा, संस्कार आणि संस्कृती तर दिलेलीच आहे. गेली अनेक शतकं परकीय आक्रमणं झेलून या वारकरी सांप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. जे आयुष्यभर पंढरीची वारी करत असतात, त्यांचं मार्गदर्शन लाभणं हे आपलं भाग्य आहे. मोदीजी मी तुम्हाला धन्यवाद देतो, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, विठूमाऊलीही आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही पावलावर मागे राहणार नसल्याचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय.

संबंधित बातम्या

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

221 किमी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, 130 किमी तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 12000 कोटी; नितीन गडकरींची माहिती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.